मोफत नेत्र व त्वचारोग तपासणी शिबीर व टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन
[सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे मित्रमंडळ तर्फे आयोजन]
✒️बबलू भालेराव (तालुका प्रतिनिधी,उमरखेड ) मो.9637107518
उमरखेड : – (दि. 10 ऑक्टोंबर) ग्रामिण भागातील जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे व युवकांना प्रोत्साहन द्यावे या उदात्त हेतुने उमरखेड – महागाव विधानसभा मतदार क्षेत्रात कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे मित्र मंडळाच्या वतिने दि. 17 ऑक्टोंबर रोजी ढाणकी व 18 ऑक्टों रोजी विडूळ येथे मोफत नेत्र व त्वचा तपासणी शिबीर तसेच दि. 1 ते 10 नोव्हेंबर पर्यन्त गो सी गावंडे कॉलेज मैदानावर भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा प्रिमीयर लिगचे आयोजन करण्यात आले आहे.
मोफत नेत्र तपासणी करीता फेको सर्जन , तथा काचबिंदू तज्ञ डॉ . टी ए माने चातारीकर, तसेच सायन हॉस्पीटल मुंबईचे त्वचारोग तज्ञ डॉ राहुल राचेवार यांच्या कडून शिबीरात सहभागी झालेल्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.
यासह दि 1 नोव्हेंबर ते 10 नोहेंबर पर्यन्त स्थानिक गो सी गावंडे कॉलेज मैदानात उमरखेड प्रिमीयर लिग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धां आयोजित करण्यात करण्यात आली आहे यासाठी प्रथम बक्षीस 21 हजार रुपये, व्दितीय बक्षीस 11 हजार रुपये तर मॅन ऑफ द मॅच ठरणाऱ्या खेळाडूस 5 हजार रुपये बक्षीस सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे मित्र मंडळाच्या वतीने जाहिर करण्यात आले आहे . या सामन्यांचे एलईडी लाईव प्रक्षेपण महागाव फुलसावंगी येथील नागरिकांना पाहता येणार आहे.
या टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचा जास्तीत जास्त नागरिकांनी आनंद लुटावा तसेच तालुक्यातील गरजू रुग्णांनी मोफत नेत्र व त्वचारोग तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे मित्र मंडळाच्या वतिने करण्यात आले आहे.