वर्षावास प्रवचन मालिका मधील पंधरावे धम्मपुष्प संपन्न”

54
वर्षावास प्रवचन मालिका मधील पंधरावे धम्मपुष्प संपन्न"

वर्षावास प्रवचन मालिका मधील पंधरावे धम्मपुष्प संपन्न”

वर्षावास प्रवचन मालिका मधील पंधरावे धम्मपुष्प संपन्न"

✍️गुणवंत कांबळे✍️
मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०

मुंबई- सायन कोळीवाडा मधील श्रावस्ती बुध्द विहार येथे बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र. ५२२ संलग्न माता रमाई महिला मंडळ आणि श्रावस्ती बौध्दजन सेवा संघ (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि बौध्दाचार्य जितेंद्र कांबळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेले वर्षावास प्रवचन मालिकामधील पंधरावे धम्मपुष्प प्रख्यात डॉक्टर नेत्रा प्रबोध गायकवाड यांचे स्त्रीयांच्या आजाराची कारणे, लक्षणे आणि उपाययोजना ह्या विषयावर प्रबोधनातून संपन्न झाले.
ह्यावेळी विभुती मान्यवर डॉक्टर प्रबोध गायकवाड ह्यांची विशेष उपस्थिती होती. त्याचबरोबर शाखेचे अध्यक्ष प्रदिप पवार, उपाध्यक्ष दिनेश ईस्वलकर, सल्लागार शरद हातखांबकर, माता रमाई महिला मंडळ च्या अध्यक्षा आरती दिनेश ईस्वलकर, सचिव स्वप्नाली सकपाळ, सदस्य पुजा प्रदिप हरचिरकर, जेष्ठ सभासद पालकर साहेब, कोचिरकर ताई, येरडवकर काकी यांच्यासह विविध वयोगटातील शालेय विद्यार्थी मध्ये प्रामुख्याने विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

आधुनिक काळातील धावपळीच्या जीवनात बाल वयापासून वृध्द अवस्थेपर्यंत खाद्यशैली, दैनंदिन दिनचर्या, जीवनशैली मध्ये जन्मापासून टप्प्याटप्प्याने होत जाणारा बदल, त्यातून होण-या तुटी, दुर्लक्षाने कळत नकळत लहान सवयीतून मोठ्या आजाराने कसे मानवी शरीर कोलमडते ? बाल्यावस्थेतून किशोरवयीन मुला मुलींमध्ये होणारे शारिरीक, मानसिक होणारे बदल, अज्ञानातून होणा-या चुका, मासिक पाळीतील श्वेत प्रदरसह योग्य काळजी, शारिरीक स्वच्छता, विवाहानंतर सुरुवातीचे बाळंतपण, बदलणा-या सवयी, त्यातून मानसिक तणाव, चाळीशी नंतरच्या प्रौढत्वातील शारिरीक आणि मानसिक बदलाचे स्वरुप, त्याचे आजार आणि उपाय, वृद्धापकाळातील घ्यावयाची विशेष काळजी अशा बाल्यावस्थेपासून ते वृध्दापकाळापर्यंत विविध प्रकारची टप्प्याटप्प्याने होत जाणारे बदल, निर्माण होणारे आजार आणि करवयास लागणारी उपाययोजना उपस्थितीत सर्वांना खुप सुंदररित्या डॉक्टर नेत्रा प्रबोध गायकवाड यांनी प्रबोधनाव्दारे मार्गदर्शन केले.

त्यानंतर उपस्थितांपैकी शालेय विद्यार्थी विद्यार्थींनी पासून जेष्ठ नागरिकांतून प्रत्येक वयोगटातील व्यक्तींशी डॉक्टर नेत्रा आणि डॉक्टर प्रबोध गायकवाड यांनी प्रत्यक्ष संवाद साधून नागरिक आणि विद्यार्थी वर्गाला परिसंवादातून उद्भवत असलेल्या शंकेचे निवारण केले.

सांगता करताना बौध्दाचार्य जितेंद्र कांबळे गुरुजी यांनी स्त्री जन्म देते, पण ती निरोगी नसेल तर घर सुरक्षित नसते. जिच्या हाती पाळण्याची दोरी तिच जगाचा उध्दार करी हा संदेश देऊन शाखेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला मंडळ अध्यक्षा, सचिव आणि जेष्ठ नागरिकांच्या हस्ते सन्मान करून आभार मानले.अशा रितीने आधुनिक काळातील गरज ओळखून योग्य ते प्रबोधन करण्यासाठी जनजागृती खुप महत्वाची ठरते.