कलेतून विद्याथ्र्यांचा व्यक्तिमत्व विकास – कुलगुरू डॉ. प्रमोद येवले प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात युवा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

49
कलेतून विद्याथ्र्यांचा व्यक्तिमत्व विकास - कुलगुरू डॉ. प्रमोद येवले प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात युवा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

कलेतून विद्याथ्र्यांचा व्यक्तिमत्व विकास – कुलगुरू डॉ. प्रमोद येवले
प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात युवा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

कलेतून विद्याथ्र्यांचा व्यक्तिमत्व विकास - कुलगुरू डॉ. प्रमोद येवले प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात युवा महोत्सवाचे थाटात उद्घाटन
✒️ देवेंद्र भगत ✒️
अमरावती जिल्हा प्रतिनिधी

अमरावती – (दि. 10.10.2023)
कलेतून जीवनाला समृध्दी मिळते. त्यातून विद्याथ्र्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले. प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात गझल गायक श्री भीमराव पांचाळे, संस्थेचे सचिव श्री युवराजसिंह चौधरी, कोषाध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख, सदस्य श्री शंकरराव काळे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, प्राचार्य डॉ. गजानन बमनोटे, निवड समितीचे अध्यक्ष प्रा. गजानन केतकर तसेच निवड समितीचे सर्व सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
उद्घाटन झाल्याची घोषणा उद्घाटक डॉ. नितीन धांडे यांनी केली. अध्यक्षीय भाषण करतांना कुलगुरू डॉ. येवले पुढे म्हणाले, अविस्मरणीय असा हा महोत्सव होईल. संस्थेने लावलेलं महाविद्यालयरुपी रोपट¬ांचे आज वटवृक्षात रुपांतर झालं आहे. जन्मभूमीची सेवा करण्याची सेवा मला कुलगुरू म्हणून प्राप्त झाली, हे मी माझे भाग्य समजतो. आपल्यातील सुप्त कला व गुण सादरीकरणाची संधी विद्यार्थी कलावंतांना उपलब्ध झाली आहे. युवा महोत्सवातील सहभाग जीवनातील कायम आठवणी असतात. सहभागी सर्व कलावंतांना त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी यावेळी त्यांनी शुभेच्छा देवून स्पर्धेत बक्षीस मिळालं नाही, तर नाराज होऊ नका, प्रयत्नात सातत्य ठेवा, यश नक्कीच मिळेल असा आशावाद त्यांनी विद्याथ्र्यांना दिला. मराठी गझल प्रकाराला राजमान्यता देणारे प्रसिध्द गझलकार श्री भीमराव पांचाळे हे विदर्भासाठी अभिमान असल्याचे सांगून या महोत्सवाच्या माध्यमातून लोककला व संस्कृती जपा असा उपदेशही त्यांनी विद्याथ्र्यांना दिला. युवा महोत्सवातून सिनेसृष्टीत जाणा-या कलाकारांचा यापुढे सत्कार करण्याचे सुतोवाच त्यांनी दिले.
कलेमुळे यशाचा मार्ग सुकर हतो – डॉ. नितीन धांडे
उद्घाटनपर भाषणात डॉ. नितीन धांडे म्हणाले, कलेमुळे यशाचा मार्ग सुकर होतो. यशस्वी होण्यासाठी प्रत्येकांनी आपल्या अंगी कला जोपासली पाहिजे. आमच्या संस्थेत प्राचार्य राहिलेले येवले साहेब विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्यांनी कुलगुरू पदावरुन उत्कृष्ट कार्य करुन आमच्या संस्थेचा नावलौकीक वाढविला आहे. पाच विद्यापीठांचे कुलगुरू होण्याचा त्यांना मान मिळाला आहे. युवा महोत्सवात सहभागी सर्व कलावंत विद्यार्थी आपल्या कलांचं उत्कृष्टरितीने प्रदर्शन करतील. विद्यापीठाने युवा महोत्सव आयोजनाची जबाबदारी महाविद्यालयाला दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त करुन सहभागी विद्याथ्र्यांना शुभेच्छा दिल्यात.
प्रमुख अतिथी श्री भीमराव पांचाळे कलावंत विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले, की मराठी गझल घेऊन पूर्ण देशभर भ्रमण केले. गझल व रसिकांच्या प्रेमाने माझं जीवन समृध्द झालं. विद्याथ्र्यांनो कला क्षेत्रात मोठे व्हा, नावलौकीक मिळवा, समृध्द व्हा, समाधानी रहा असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. वाचलेली, ऐकलेली माणसं गेली कुठे? ही गझल त्यांनी यावेळी सादर केली.
विद्यापीठ गीत व माता सरस्वती, संत गाडगे बाबांच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने महोत्सवाची सुरुवात झाली. प्रास्ताविक भाषणतून संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी युवा महोत्सव आयोजनामागील भूमिका विषद करतांना सांगितले, 180 पेक्षा अधिक महाविद्यालयांमधील कलावंत विद्यार्थी या युवा महोत्सवात सहभागी झाले आहेत. तर प्राचार्य डॉ. गजेंद्र बमनोटे यांनी आयोजनाबाबत भूमिका स्पष्ट केली. यावेळी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मागील वर्षीच्या युवा महोत्सवाचे यशस्वी आयोजनाबद्दल श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातील संयोजक डॉ. सुभाष गावंडे व सहसमन्वयक प्रा. वैशाली देशमुख यांचा शाल, श्रीफळ देऊन कुलगुरूंनी सत्कार केला.
विशेष पुरस्कार
युवा महोत्सवात आदर्श विद्यार्थी पुरस्कार – 2022 ने श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाचा श्री रोहन पन्नालाल बुंदेले, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीची स्वरश्री गजानन केतकर यांचा उत्कृष्ट कलावंत पुरस्कार – 2022 ने, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा हिमांशू प्रवीण जैन याचा आणि बेस्ट एन.सी.सी. कॅडेट पुरस्कार – 2022 ने डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावतीची आकांक्षा अविनाश असनारे व जनता कला व वाणिज्य महाविद्यालय, मलकापूरचा प्रवीण समाधान चिमकर यांचा कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संचालन ध्रुव शिंदे व वैभवी काळे यांनी, तर आभार कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी मानले. महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. विजय काळे, युवा महोत्सव समन्वयक प्रा. राज देशमुख, डॉ. निक्कू खालसा यांचेसह महाविद्यालयातील शिक्षकगण आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाला विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणींचे सन्माननीय सदस्य, शिक्षक, विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.