बदलापूर : चिमुकल्याचा स्कूल बसचालकाकडून लैंगिक छळ, जाब विचारणा-या वडिलांनाच बेदम मारहाण
बदलापूर: बदलापूर येथील गुरुकुल इंटरनॅशनल शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकणा-या एका चिमुकल्याचा लैंगिक छळ शाळेच्या बस चालकाने केला आहे. हा प्रकार विद्याथ्र्याने पालकांना सांगितल्यावर त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडीलांनाही या बस चालकाने आपल्या चार साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केली आहे. या प्रकारानंतर आरोपी बस चालकाच्या विरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
बदलापूरात राहणारे मंगेश पाटील यांचा मुलगा हा गुरुकुल इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिकत आहे. शाळेचा बसचालक रवी लवाटे हा बसमधून प्रवास करणा-या पाटील यांच्या मुलासोबत अश्लिल चाळे करत होता. हा प्रकार त्या मुलाने आपल्या पालकांना सांगितला. तसेच या भितीने तो शाळेत जाण्यासाठी घाबरत होता. वडील मंगेश पाटील यांनी या प्रकाराचा जाब विचारला असता बसचालकाने त्याच्यावरच हल्ला केला. रवी लव्हाटे सोबत इतर त्याच्या बस चालक सहका-यांनी देखील पाटील यांना जबर मारहाण करत दहशत निर्माण केली. या प्रकारानंतर जखमी पाटील यांना उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारानंतर बस चालक रवी लव्हाटे याच्या विरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलीसांनी अद्याप अटक केलेली नाही.
दरम्यान, या प्रकरणात माहिती घेतली असता हा प्रकार 6 ते 9 महिन्यापूर्वीचा असून या प्रकरणाची तक्रार आल्यावर वडिलांनी विद्यार्थ्याची बस देखील बदलली होती. बस बदलल्यावरही लव्हाटे हा विद्यार्थ्याला रागाने पाहत होता. त्यामुळेच पाटील यांनी या प्रकरणाचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र बस चालकाने या पालकालाच मारहाण केली. या प्रकरणात पाटील यांनी केवळ बस चालकाकडे तक्रार केली होती. मात्र, शाळेकडे कोणतीच तक्रार केली नव्हती हे समोर आले आहे.
‘‘रवी लव्हाटे हा नेहमीच माझ्या मुलासोबत अश्लिल चाळे करित होता. त्याचा जाब विचारल्यावर त्याने हा हल्ला केला आहे. त्यात माझा आणि माझ्या मुलाची कोणतीच चुक नसतांना त्याने हा हल्ला केला आहे. या प्रकरणाची तक्रार बस मालकाकडे केली होती. त्यानंतर बस देखील बदलली होती. मात्र लव्हाटे याने आधीचा राग कायम ठेवत त्या मुलाला त्रास देणे सुरुच ठेवले होते.
– मंगेश पाटील, वडील
‘‘ मंगेश पाटील यांनी मुलासोबत घडलेल्या प्रकाराची कोणतीच माहिती शाळा प्रशासनाला कधीच दिली नाही. 9 महिन्यांपूर्वी हा प्रकार असुन त्याची कल्पना बसमधील महिला प्रतिनिधीला देण्यात आलेली नाही. येवढेच नव्हे तर शाळेलाच नव्हे पालकांच्या मिटींगमध्ये देखील या प्रकाराची कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. तक्रार आली असती तर योग्य कारवाई करणो शक्य होते.
– हितेंद्र नायक, ट्रस्टी, गुरुकुल इंटरनॅशनल स्कुल
चिमुकल्याचा स्कूल बसचालकाकडून लैंगिक छळ, जाब विचारणा-या वडिलांनाच बेदम मारहाण
मीडिया न्यूज़ वार्ता