मित्रच झाले वैरी….
तरूणाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक
• नशेत असताना क्षुल्लक वादातून केली हत्या
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
राजुरा : 11 ऑक्टोबर
मद्य प्राशनानंतर झालेल्या क्षुल्लक शाब्दीक वादातून रामपूर येथील संदीप निमकर या युवकाची मंगळवारी निर्घूण हत्या करण्यात आली. याप्रकरणी राजुरा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना बुधवारी अटक केली. विरेंद्र बोतला, विष्णू बोतला व संकेत उमरे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
मृतकाचा मारेकरी वीरेंद्र बोंतला याला मंगळवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, मृतक व आरोपी एकाच वॉर्डात राहत असल्याचे सांगितले. घटनेच्या दिवशी मृतक व आरोप तिघेही दारू पिण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेले. त्याठिकाणी नशेत असताना संदीप व विरेंद्र यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. राग अनावर झाल्याने काठी व दगडाने संदीपचा खून केल्याची कबुली दिली. यात त्यांच्या साथीला आरोपीचा भाऊ विष्णू बोंतला व संकेत उपरे होता. त्याने या हत्येसाठी मदत केल्याची कबुलीही त्याने दिली. पोलिसांनी बुधवारी 11 ऑक्टोंबर रोजी त्या दोघांना अटक केली. आरोपीविरूद्ध भादंवी कलम 302, 43, 201 कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास पोलिस निरिक्षक योगेश्वर पारधी करीत आहेत.