आय बी पी एस ने घेतलेल्या पशुधन पर्यवेक्षक पदांच्या परीक्षेचा निकाल त्वरित जाहीर करण्यात यावा याबाबत आझाद समाज पक्षांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे यांनी परिक्षेचा निकाल लावण्यास दिरंगाई मुळे विद्यार्थ्यांत संभ्रम

आय बी पी एस ने घेतलेल्या पशुधन पर्यवेक्षक पदांच्या परीक्षेचा निकाल त्वरित जाहीर करण्यात यावा याबाबत आझाद समाज पक्षांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे यांनी परिक्षेचा निकाल लावण्यास दिरंगाई मुळे विद्यार्थ्यांत संभ्रम

आय बी पी एस ने घेतलेल्या पशुधन पर्यवेक्षक पदांच्या परीक्षेचा निकाल त्वरित जाहीर करण्यात यावा याबाबत आझाद समाज पक्षांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे यांनी परिक्षेचा निकाल लावण्यास दिरंगाई मुळे विद्यार्थ्यांत संभ्रम

✒️ देवेंद्र भगत ✒️
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
मो.8275348920
अमरावती. दिनांक (11.10.23) IBPS कंपनी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा निकाल शक्यतो 15 ते 20 दिवसांत जाहीर होतो. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व जलद होण्यासाठी शासनाने परीक्षा फी 900 ते 1000 रुपये आकारात आहे. मात्र,  आपल्या विभागांतर्गत संदर्भिय परीक्षा होऊन जवळपास 1 महिना लोटत आहे तरीही अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाही.
राज्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढता आहे. त्यात पशुसंवर्धन विभागात कर्मचारी कमतरता आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाला कर्मचारी भरती लवकर होणे गरजेचे आहे. असे असतांना सदर परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास अतिविलंब होत असल्यामुळे आम्हा उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे.
तथापि, आपल्या विभागांतर्गत दि. 09/09/2023 रोजी घेण्यात आलेल्या पशुधन पर्यवेक्षक पदाचा निकाल जाहीर करावा अथवा परीक्षेच्या निकालाची तारीख पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईटवर त्वरित जाहीर करण्यात यावी.
                        
                  
                  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here