नराधमास कठोर शिक्षा द्यावी चर्मकार बांधवांनी ऊपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले
✒️ बबलू भालेराव ✒️( तालुका प्रतिनिधी ऊमरखेड ) मो.9637107518
उमरखेड (दि. 13 ऑक्टोंबर)
अल्पवयीन शाळकरी मुलीवर नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिला जिवे मारण्याची धमकी दिली,सदर नराधमावर अनेक गुन्हे दाखल असून त्याने मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले.
अशा नराधमास कठोर शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवून अल्पवयीन शाळकरी मुलीस न्याय मिळवून देण्यात यावा..!
यासाठी आज उपविभागिय अधिकारी उमरखेड डॉ.व्यंकट राठोड यांना निवेदन देण्यात आले यावेळी माजी आमदार राजेंद्र नजरधने,दत्ता गंगासागर, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष इंजिनिअर चंद्रप्रकाश देगलूरकर,व्ही.एम.ईंगळे, स्वाती पाचकोरे, कविता गंगासागर, सविता पाचकोरे,भारती पाचकोरे, संजय ईटकरे, गजानन नारायण वानखेडे, अवधूत विनकरे, विनोद पिंपरखेडे,किसन वानखेडे, एस.यु.भरणे, भगवान गायकवाड,असंख्य चर्मकार समाज बांधव, भगिनी निवेदन देतांना उपस्थित होते.