साई सेवानिवासी मतिमंद मुला मुलींची शाळा येथे शिबिर संपन्न

51
साई सेवानिवासी मतिमंद मुला मुलींची शाळा येथे शिबिर संपन्न

साई सेवानिवासी मतिमंद मुला मुलींची शाळा येथे शिबिर संपन्न

साई सेवानिवासी मतिमंद मुला मुलींची शाळा येथे शिबिर संपन्न

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
सामाजिक बातमी

आज दिनांक ०६/१०/२०२३ शुक्रवार रोजी साई सेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे जागतिक सेरेबल पाल्सी (मेंदूचा पक्षघात) दिनानिमित्त लोणी येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स डॉ. ए पी जे अब्दुल कलाम कॉलेज ऑफ फिजिओथेरपी डिपार्टमेंट ऑफ पेडीयाट्रिक फिजिओथेरपी सेंटरचे विद्यालयात शिबिर घेण्यात आले.
याप्रसंगी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या वतीने डॉ.तेजस बोरकर यांनी सेरेबल पाल्सी (मेंदूचा पक्षघात) याविषयी माहिती दिली.
मेंदूचा पक्षघात (सेरेबल पाल्सी) हा आजार नसून ही एक स्थिती आहे. यात व्यक्तीचे स्नायू कडक होतात. हातापायांच्या हालचाल होत नाही ते काही प्रमाणात इतरांवर अवलंबून असतात यासाठी फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपीचा वापर करून व्यक्तीच्या स्थितीत बदल करून स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला जातो. अशी माहिती सांगण्यात आली.
याप्रसंगी शाळेतील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली व दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
तसेच लोणी येथील उद्योजक श्री संजयजी कटारिया यांचेकडून मुलगा स्व. कै. अक्षय संजय कटारिया स्मृतिदिनानिमित्त विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस तसेच फळे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला.