सिरोंचा तालुक्यातील अमरावती व अहेरी तालुका आलापल्ली येथील युवकांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत केला प्रवेश

46
सिरोंचा तालुक्यातील अमरावती व अहेरी तालुका आलापल्ली येथील युवकांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत केला प्रवेश

सिरोंचा तालुक्यातील अमरावती व अहेरी तालुका आलापल्ली येथील युवकांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत केला प्रवेश

सिरोंचा तालुक्यातील अमरावती व अहेरी तालुका आलापल्ली येथील युवकांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत केला प्रवेश

मारोती काबंऴे
मीडिया वार्ता न्यूज
गडचीरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मों नं.9405720593

अहेरी: वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधाराशी प्रभावित होऊन श्री मा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून श्री मा आदित्यजी उद्धवसाहेब ठाकरे युवा सेना प्रमुख युवा हृदय सम्राट यांच्या कुशल कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून दिनांक 13 ऑक्टोबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंपर्क जिल्हा कार्यालय अहेरी येथे अमरावती व आलापल्ली येथील युवकांनी श्री रियाज शेख जिल्हाप्रमुख यांच्या शुभहस्ते शिव बंधन बांधून व शिवसेने पक्षाच्या भगवा दुपट्टा टाकून राहुल झाडी अमरावती, रवी समय्या मुलकरी, सागर बाणया कुंभारी, महेंद्र मल्लय्या कावरे, धनुकुमार शंकर घोडेला, साईकुमार मल्लय्या कुमरी,राजेश्वर झाडी, प्रणय श्रीनिवास गोदारी, सागर कोहळे अल्लापल्ली, शुभम झोरे आलापल्ली, रवी कपलवर आलापल्ली, आरिफ शेख आलापल्ली, शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या पक्ष प्रवेश कार्यक्रमात श्री विलास सिडाम सदस्य नगर पंचायत अहेरी श्री प्रफुल एरणे तालुकाप्रमुख अहेरी श्री सुनील वासनिक तालुकाप्रमुख ग्रामीण अहेरी सौ चंदनाताई बिश्नोई उपजिल्हा संघटिका अहेरी विधानसभा श्री रघुनंदन जाडी तालुकाप्रमुख सिरोंचा यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश कार्यक्रम घेण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख श्री रियाज शेख यांनी प्रवेश केलेल्या सर्व युवकांच्या अभिनंदन केले तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काम जोमाने सुरू असल्याने श्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख यांच्या कुशल नेतृत्व व प्रामाणिक छबी इमानदार कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून दिवसेंदिवस शिवसेनेत पक्षप्रवेशाचे सत्र कायम सुरू आहे नक्कीच विधानसभा क्षेत्र शिवसेनेच्या गड बनल्याशिवाय राहणार नाही असे जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी यावेळी सांगितले