मुंबई हल्यातील मास्टर माईंड जकीउर रहेमान लख्वीला टेरर फंडिंगप्रकरणी 15 वर्षांची शिक्षा.

हिरामण गोरेगांवकर

मुंबई:- 8/01/2021 लष्कर ए तोयबाचा ऑपरेशन कमांडर आणि मुंबई हल्याचा मास्टर माईंड जकीउर रहेमान लख्वीला टेरर फंडिंग प्रकरणी पाकिस्तानातील कोर्टाने 15 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. टेरर फंडिंग संबंधित एका प्रकरणात लख्वीला काही दिवसापूर्वी अटक करण्यात आली होती.लाहोरच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने शुक्रवारी लख्वीला शिक्षा सुनावली आहे.

 

सन 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्याचा लख्वी हा मास्टर माईंड आहे. तसेच लाहोर मध्ये हि लख्वीच्या विरोधात टेरर फंडिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो डिस्पेंसरीच्या नावाखाली पैसे जमा करत होता आणि त्याचा वापर दहशतवादी कृत्य करण्यासाठी करायचा असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. तसेच दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हा पैसा वापरण्यात येत होता. संयुक्त राष्ट्रांनीही जकीउर रहमान लख्वीला दहशतवादी घोषित केले होते. मात्र त्याच्यावर कारवाई करण्यात येत नसल्याने तो खुलेआम फिरत होता. मात्र काळ्या यादीत जाण्याच्या भीतीने एफएटीएफच्या बैठकीपूर्वी पाकिस्तानने त्याच्या वर कारवाई केली आहे. आता न्यायालयाने त्याला 15 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्याप्रकारानी हाफिस सईदसोबत लख्वीही मुख्य आरोपी आहे. या प्रकरणी त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र 2015 पासून तो जामिनावर सुटला आहे. काही दिवसापूर्वी त्याला अटक करण्यात आल्याने अमेरिकेनेही समधान व्यक्त केले होते.

दहशतवाद विरोधात कठोर कारवाई करत नसल्याने पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये टाकण्याचा धोका आहे. त्यामुळे एफएटीएफ च्या बैठकीपूर्वी पाकिस्तानने दहशतवाद विरोधात कारवाईला सुरवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here