बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनमध्ये
इन्स्टिट्यूट-इंडस्ट्री कनेक्ट कार्यक्रम संपन्न
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर : 14 ऑक्टोंबर
बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन येथे इन्स्टिट्यूट इंडस्ट्री कनेक्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वतःच्या कर्तुत्वाने मोठ्या पदावर कार्यरत व विविध उद्योगात आपले नाव उंचावीत असलेल्या अश्या व्यक्तींचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. बुधवार, ११ ऑक्टोंबर रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी संस्थेचे मुख्य कार्यपालन अधिकारी भरत बजाज, संस्थेचे प्राचार्य एस. ई. ठोंबरे, आणि प्रसिद्ध उद्योजक मधुसुधन रुंगठा, प्रा. विजय कोयाळ, प्रा. शर्मा, सर्व विभाग प्रमुख तसेच विभाग समन्वयक व इतर उद्योजक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात संस्थेच्या व्हिजन वाचनाने करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य एस. ई. ठोंबरे यांनी केली. तर प्रा. विजय कोयाळ यांनी एनबीए अवेयरनेस बद्दल सर्व उपस्थित उद्योजकाना व इतर मान्यवरांना माहिती करून दिली. या कार्यक्रमाला लाभलेले मुख्य उद्योजक मधुसुधन रुंगठा यांनी स्थानिक उद्योगांचे महत्त्व विषद केले, व कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले. त्यानंतर संस्थेचे मुख्य कार्यपालन अधिकारी भरत बजाज यांनी आपल्या भाषणात म्हटले कि अश्या कार्यक्रमाचे आयोजन यानंतरही मोठ्या स्वरुपात करण्यात येईल. या कार्यक्रमा प्रसंगी १८ उद्योजक उपस्थित होते. त्यानंतर उपस्थित सर्व उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. शर्मा यांनी मानले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. झाडे, प्रा.नगरकर , व्यास आणि दिपक मोगरे यांनी सहकार्य केले.