आदिमाया, स्त्रीशक्तीचा आजपासून जागर ग्रामदेवालये नवरात्रौस्तव मंडले सजली टिपऱ्यावर घुमणार तरुणाईची पावले…..
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-सर्व मंगल मागल्यै शिवे सर्वार्थ साधिके|शरण्ये त्रयंबिके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वांचे मनोरथ पूर्ण करणा-यां शुभ, मंगलमय, कल्याणकारी,महादेवी मी तुला शरण आलो आहे. तू त्रिकालदर्शी असून माझ्यावर कृपा कर.तुला नमस्कार असो नमस्कार असो. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवतांचे शारदीय नवरात्र घेऊन येणाऱ्या मंगलमय आल्हाददायक उत्साहवर्धक अशा स्त्रीशक्तीचा जागर आजपासून म्हणजेच रविवार दि.१५ ऑक्टोबर पासून सुरु झालं आहे.ठीक ठिकाणी ग्रामदैवताचे मंदिर नवरात्रौस्तव साजरा करण्यासाठी नऊ दिवस तरुणाईची पावले टिपऱ्यावर फिरकणार आहेत.यां उत्सवामुले एक वेगळे चैतन्य पावलांनी दिसून येणार आहे.
गणपती उत्सव संपला की नवरात्री उत्सव सुरु होतो त्यापूर्वी पितृपक्ष कधी संपला हे आपल्याला कळतच नाही जागोजागी देवींची स्थापना त्यासाठी मोठ मोठे मंडप उभारली जातात पुजा पाठ अश्विन सुद्ध प्रतिपादेला घटस्थापना होते मटक्यामध्ये धान्य पेरले जाते त्यावर अखड नंददीप लावला जातो तसेच फुलांची माल घंटावर चढवली जाते प्रत्येक घराची पद्धत वेगवेगळी असते आणि प्रत्येक ठिकाणी देवींची वेगवेगळी स्पे व नावानी ओळखल्या जाणाऱ्या देवींची स्थापना होते.
नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे.प्रारभी तो एक कृषीविषयक लोकोस्तव होता पावसाळ्यात पेरलेले पाहिले पिक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करायचं नवरात्रीत घटस्थापनेवेळी नऊ दिवस नऊ धान्याची पेरणी करतात व दसऱ्याची दिवशी ते धान्याची वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात ही प्रथा यां सणाचे कृषीविषयक स्वरूप व्यक्त केले जाते यापुढे यां सणाला धार्मिक महत्व म्हणून प्राप्त झाले नवरात्र भगवती देवीच्या उपासनेचा सण बनला अशा यां देवीचे नऊ रूप बघितल्या नंतर तिचे ते नऊ दिवसाच्या आपल्या घरातले मंगलमय मांगल्य वास्तव्यात आले त्यात आपली कुलदैवता आहे तिचा जप हे जास्तीत जास्त केल्यास त्यास श्रेष्ठत्व प्राप्त होते.