मतदार याद्यांचा विशेष संक्षित पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

45
मतदार याद्यांचा विशेष संक्षित पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

मतदार याद्यांचा विशेष संक्षित पुनरिक्षण कार्यक्रमाचे
सुधारीत वेळापत्रक जाहीर

मतदार याद्यांचा विशेष संक्षित पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :- भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षित पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे.मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना विशेष संक्षिप्त् पुनरिक्षण कार्यक्रम 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीचा कालावधी पुढीलप्रमाणे आहे.पुररिक्षणपूर्व उपक्रमांतर्गत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरणे व प्रमाणीकरण, कंट्रोल टेबल अद्यावत करणे इत्यादी- मंगळवार 22 ऑगस्ट ते सोमवार 9 ऑक्टोबर,2023, नमुना 1 – 8 तयार करणे आणि 1 जानेवारी-2024 या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकत्रित प्रारुप यादी तयार करणेसाठी मंगळवार 10 ऑक्टोबर 2023 ते गुरुवार 26 ऑक्टोबर,2023 या कालावधीत होईल.

पुररिक्षण उपक्रमांतर्गत एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे शुक्रवार 27 ऑक्टोबर 2023, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी शुक्रवार 27 ऑक्टोबर,2023 ते शनिवार 9 डिसेंबर 2023 दरम्यान आहे.
विशेष मोहिमेचा कालावधीत दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य् निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य् यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवारी हा कालावधी असून दावे व हरकती निकालात काढणेसाठी मंगळवार 26 डिसेंबर,2023 पर्यंत असून मूळ दिनांकात बदल नाही.मतदार यादीची शुद्धता तपासणी व अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणी आणि डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे सोमवार, 1 जानेवारी 2024 पर्यंत असून बदल नाही. मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी करणेसाठी शुक्रवार, 5जानेवारी 2024 पर्यंत असून त्यामध्ये बदल केलेला नाही.मतदार याद्यांचा विशेष संक्षित पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी जवळच्या मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचे कार्यालय यांच्याशी संपर्क साधण्यात यावा असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.