श्री रविप्रभा मित्र संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत म्हसळा तालुक्यातील दहा क्षयरुग्णांना पोषक आहार वाटप.
🖊️ नंदकुमार चांदोरकर 🖊️
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048
माणगाव: 18 ऑक्टोंबर, म्हसळा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात पंतप्रधान टि.बी.मुक्त भारत अभियानांतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत श्री रविप्रभा मित्र संस्थेच्या वतीने म्हसळा तालुक्यातील दहा क्षयरुग्ण यांना सहा महिने पुरेल एवढे पोषण आहार देण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून म्हसळा तालुक्यातील सौ.मनाली मंगेश मुंडे यांनी २०१९ रोजी यकृत अवयव दान करून एका व्यक्तीला नवसंजीवनी दिली होती अवयव दान सर्व श्रेष्ठ दान आहे हे सिद्ध केले सौ मुंडे यांनी उल्लेखनीय कामगिरी करून जनमानसात आदर्श निर्माण केले आहे या मुळे सौ.मनाली मंगेश मुंडे यांना श्री रविप्रभा मित्र संस्था यांच्या कडून शाल, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी सौ.मुंडे यांचे पती व रायगड बँकेचे म्हसळा व्यवस्थापक मंगेश मुंडे यांनी संस्थेचे खूप आभार मानले कारण गेली पाच वर्षे आमची दखल कोणत्याही संस्थेने व ईतर कोणीही घेतली नव्हती पण या संस्थेने आमची दखल घेऊन आम्हाला सन्मानित केले मी धन्य झालो आहे असे बोलताना भाऊक होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या, तसेच पोलीस निरीक्षक संदिपान सोनावणे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त करुन संस्थेला पुढील शुभेच्छा दिल्या. या वेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ महेश मेहता यांनी जमलेल्या जनसमुदाय यांच्या सोबत अवयव दान बाबतीत शपथ घेतली व नागरिकांना अवयव दान करा असे आवाहन केले. अवयव दान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे सौ मुंडे यांचे उदाहरण देऊन सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परवेक्षिका काते यांनी केले तर संस्थेचे प्रस्थाविक संतोष उध्दरकर यांनी केले व आभार डॉ, पाटील यांनी मानले तसेच संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांनी देखील मान्यवरांचे व डॉ मेहता यांचे आभार मानले. संस्थेच्या पदाधिकारी व महिला सदस्य यांना निक्षय मित्र म्हणून म्हसळा ग्रामीण रुग्णालयाकडून प्रशस्तीपत्र देण्यात आले. या वेळी उपस्थित म्हसळा पोलीस निरीक्षक संदिपान सोनावणे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश मेहता,संस्थेचे अध्यक्ष व माजी सभापती रविंद्र लाड,सिध्दी हाँटेलचे मालक चंद्रकांत कापरे, भाजप माजी तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, जेष्ठ पत्रकार उदय कळस,पत्रकार अशोक काते, पत्रकार श्रीकांत बिरवाडकर, सामाजिक कार्यकर्ते मंगेश मुंडे, रायगड बँक म्हसळा व्यवस्थापक मंगेश मुंडे, सौ. मनाली मुंडे, पत्रकार शशिकांत शिर्के, संस्थेचे सचिव नितीन रिकामे,ग्रामसेवक योगेश पाटील,सुशांत लाड,समीर लांजेकर, स्वप्नील लाड,दत्तात्रय लटके, शंकर कासार, तुकाराम भेलेकर,संतोष सुर्वे, सुजित काते,विजय पाटील, सानप,सुसंगीत म्युझिक अँकेडमी चे पंकज आगरकर, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व महिला सदस्य व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.