भूमिपुत्रांच्या कंपनी प्रशासन विरोधी आंदोलनात भावी खासदार माधवी ताई जोशी आणि सुप्रसिद्ध उद्योजक नरेश जोशी यांचा सक्रिय सहभाग.

48

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞 ९०१११९९३३३ 📞

तळेगाव MIDC येथील जनरल मोटर्स ही कंपनी बंद करून दुसरीकडे हलवण्याचा निर्णय डायरेक्टर व शासनाच्या मार्फत करण्यात आला आहे. त्याला जवळ जवळ ३ वर्ष पूर्ण होत असून त्या कंपनी मधील आपल्या महाराष्ट्रातील स्थानिक भूमिपुत्र सुमारे १००० कामगार रस्त्यावर आले आहेत आणि आता तेथे हुंडाई या कंपनीने तेथील कंपनी चालवण्यासाठी घेतली असून जे १००० कामगार त्या कंपनी मधून काढण्यात आले आहे ते कामगार गेले काही दिवसांपासून वारंवार शासनाला मागणी करत आहेत की आम्हाला त्या कंपनी मध्ये कामावर घेण्यात यावे. पण याची दखल कोणीही घेत नसल्याने त्या सर्व कामगारांना दिनांक २-१०-२०२३ पासून बेमुदत साखळी उपोषण करीत आहेत. १७ ते १८ दिवसा झाले आहेत. तरी देखील शासन हे कुठले ठोस पाऊल घेण्यास तयार नाही. तब्बल १००० कामगार व त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब जवळपास ५००० लोकांचा संसार रस्त्यावर येण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यातील महिला व त्यांची लहान मुले देखील या उपोषणाला पाठिंबा देत आहेत. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे सदर कंपनी व प्रशासन दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. कंपनी निलंबित कामगार भरतीला आज ३ वर्षे होऊन गेली तरी काहीच सकारात्मक प्रतिक्रिया नाही. सदर प्रलंबना दरम्यान कंपनीतून बाहेर काढलेल्या कामगारांन पैकी अद्याप ५ जणांचा मृत्यू देखील झाल आहे. उपोषणकर्त्यांच्या या मागण्यांसाठी भावी खासदार यांनी पूर्णपणे पाठिंबा दर्शविला आहे. तसेच मृत कामगाराच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च माधवी ताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठान करेल असे आश्वासन देखील दिले आहे. तसेच वेळ आल्यास माधवी ताई ह्या स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर उपोषणास बसणार आहेत. स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या हक्कासाठी लढण्यास प्रोत्साहन देणार असून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यास प्रतिष्ठान सदैव तत्पर असेन.