युवासेना तर्फे जागर दुर्गेचा – सन्मान स्री कर्तुत्वाचा,
चौथ्या दिवसाचा मान श्रीमती पीट्टी हरी मांडवकर वय वर्ष ९० यांना मिळाला.
🖊️नंदकुमार चांदोरकर🖊️
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048
माणगाव : युवासेने तर्फे जागर स्त्री शक्तीचा हा नवरात्रीमध्ये एक उपक्रम हाती घेतला असून आज चौथ्या दिवसाचा मान म्हसळा तालुक्यातील चिराठी वरील सौ.श्रीमती पिट्टी हरी मांडवकर – चिराठी यांना दिला गेला आहे. आज त्यांचे कार्य म्हटल तर डोंगराळ भागात असलेल्या गावात गरोदरपण ते वेगवेगळ्या आजूबाजूच्या गावात जाऊन करत होत्या. त्यांचा आधार संपूर्ण पंचक्रोशीतील महिलांना आहे. त्या प्रत्येक महिलेचे सुख दुःख विचारात घेउन आपले निस्वार्थीपणे कार्य करत असतात.. या अशा उपक्रमामुळे आपले आयुष्य समाजाला वाहून देणाऱ्या वेगळ्याचं माऊलींचे दर्शन घडून आले. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून त्यांचं समाजकार्य सुरू होते.त्यांचं आजचे वय ९० पार असून ती माया व तिचं आपुलकी जिव्हाळा अजूनही तसाच आहे हे अनुभवता आले.माऊलीचा सत्कार करताना श्री. युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ विलास करडे, चिराठि गावचे अध्यक्ष,युवासेना तालुका चिटणीस कू. राहुल जैन, युवासेना शहर अधिकारी अजय करंबे, युवासेना माजी विभाग अधिकारी विशाल सायकर, कडवट शिवसैनिक सचिन महामुणकर ,कडवट शिवसैनिक समीर लांजेकर, संतोष खताते व अन्य गावांतील प्रमुख युवक उपस्थित होते.