पोलीस स्मृतिदिन म्हणून नेरळ पोलीस ठाणे वतीने मानवंदना

48

पोलीस स्मृतिदिन म्हणून नेरळ पोलीस ठाणे वतीने मानवंदना

संदेश साळुंके

कर्जत रायगड प्रतिनिधी

मो: ९०१११९९३३३

नेरळ : 21 ऑक्टोबर ह्या दिवशी पोलीस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने नेरळ येथे २६/११ च्या आतंकवादी हल्ल्यात अनेक जण शहीद झाले होते त्यातील एक नेरळ येथील रहिवासी पोलीस शिपाई शहीद योगेश पाटील हे होते. यांचे फलकाला नेरळ पोलीस ठाणे वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजी धवळे, अंमलदार व पोलीस कर्मचारी यांचेमार्फत पुष्पहार हार घालून 2 मिनिटे मौन बाळगून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.