ठाण्यात रक्तबंबाळ थरार, पोलिसामुळे थोडक्यात वाचला महिलेचा जीव.

प्रियंका पवार प्रतिनिधी

ठाणे :- विजय सदन, किसननगर नं. 2 वागळे इस्टेट ठाणे येथे घराच्या जागेवरून वाद सुरू असल्याचा फोन श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये आला. त्यानंतर ताबोडतोब पोलीस शिपाई मुकुंद राठोड आणि पोलीस शिपाई सुनिल धोंडे यांनी घटनास्थळी घाव घेतली. घटनास्थळी पोहोचताच विजय सदन या इमारतीतून एक महिला रक्क बंबाळ अवस्थेत धावत पोलिसांकडे आली. त्या महिलेच्या गळ्यावर कोणी तरी धारदार शस्त्रांनी वार केले होते. त्यामुळे तिझ्या गळ्यातून रक्त वाहत होते. या महिलेचा जीव वाचेल की नाही असं वाटत असतानाच पोलीस शिपाई सुनिल धोंडे यांनी ओढणीने त्या महिलेचा गळा आवळून बांधला आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

दुसरीकडे, विजय सदन इमारतीतून अजूनही ओरडण्याचा आवाज येत होता. धोंडे आणि राठोड यांनी इमारतीच्या आत धाव घेतली आणि त्यांनी पाहिले की आरोपी हातात चाकू घेवून आत्महत्या करण्याची धमकी देत होता आणि त्याच्या पायाजवळ एक पुरुष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. जीव धोक्यात टाकून पोलीस शिपाई सुनिल धोंडे आणि मुकुंद राठोड यांनी त्या आरोपीला पकडले आणि त्याच्या हातून चाकू हिसकावून घेतला. खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पुरूषाला तपासले असता त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवताच तो आरोपी पोपटा सारखा बोलू लागला.

महेंद्र कर्डक असं आरोपीने त्याचे नाव सांगितले. गळ्यावर वार झालेल्या महिलेचे नाव निता कर्डक तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पुरुषाचे नाव अजय कर्डक असल्याचे सांगितले. निता ही आरोपी महेंद्र कर्डकचा भाऊ राजन कर्डकची पत्नी आहे. तर विजय कर्डक हा नात्याने महेंद्र कर्डकचा भाऊ लागतो. निता कर्डक राहत असलेल्या घरावरुन महेंद्र आणि निता यांचे वाद सुरु होते. त्यानंतर वाद इतके विकेपाला गेले की महेंद्रने निता घराचा दरवाजा उघडत नाही म्हणून दरवाजा तोडून घरात शिरला आणि नितावर धारदार शस्त्राने वार करु लागला.

निताच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच बाजूला असलेला विजय कर्डक निताच्या मदतीला धावून गेला आणि त्याने महेंद्रला हटकले. पण महेंद्रला राग इतका अनावर झाला होता की त्याने त्याच्याजवळ असलेले धारदार शस्र थेट विजयच्या पोटात भोकसले आणि त्याच्यावर वार केले. हीच संधी साधत निताने महेद्रंच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली आणि बिल्डिंगच्या बाहेर धाव घेतली. तोच पोलीस शिपाई धोंडे आणि राठोड हे निताला भेटले आणि निताचा जीव वाचला. पण निता आणि महेंद्रच्या भांडणात विजयचा नाहक जीव गेला. पोलिसांनी महेंद्रला अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

 

या घटनेत पोलीस शिपाई सुनिल धोंडे यांच्या हुशारीने महिलेचा जीव वाचला. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे, तर पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस शिपाई धोंडे यांना कौतुकाची थाप देत त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here