श्री साई पॉलीटेक्नीक येथे इन्डस्ट्री इन्स्टीटयुट संवाद कार्यक्रमाचे आयोजन

60
श्री साई पॉलीटेक्नीक येथे इन्डस्ट्री इन्स्टीटयुट संवाद कार्यक्रमाचे आयोजन

श्री साई पॉलीटेक्नीक येथे इन्डस्ट्री इन्स्टीटयुट संवाद कार्यक्रमाचे आयोजन

श्री साई पॉलीटेक्नीक येथे इन्डस्ट्री इन्स्टीटयुट संवाद कार्यक्रमाचे आयोजन

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर : 27 ऑक्टोंबर
स्व. मुरलीधरराव येरगुडे स्मृती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालीत श्री साई पॉलीटेक्नीक चंद्रपूर येथे इन्डस्ट्री इन्स्टीटयुट संवादाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

संस्थेतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण देण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थाध्यक्ष प्रा. विद्या व्ही. येरगुडे मॅडम, उपाध्यक्ष अभिषेक व्ही. येरगुडे आणि सचिव अमित व्ही. येरगुडे यांच्या मार्गदर्शनात संस्थेत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच दृष्टीकोनातून संस्थेद्वारे ‘इन्डस्ट्री इन्स्टीटयुट संवाद’ याकरीता उद्योग जगतातील नामांकीत उद्योगपती मधूसुदन संगठा, अध्यक्ष-विदर्भ असोसिएशन एम.आय.डी.सी, रविंद्र लाखे, सेट्रल इंडिया इंजिनिअरींग एम.आय.डी.सी, चंद्रपूर, संजय कासट, आनंद इंजिनिअरींग चंद्रपूर, अवनितकुमार जोशी, डायरेक्टर अँड हेड, चंद्रपूर, धिरज तातेवार, एच. आर. धारीवाल, चंद्रपूर आणि एच. वाय. ठाकरे, सेवानिवृत्त इंजिनिअर, चंद्रपूर यांच्या संवादाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला लाभलेल्या सर्व मान्यवरांचे उपाध्यक्ष अभिषेक व्ही. येरगुडे आणि सचिव अमित व्ही. येरगुडे यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य एस. एन. पिलारे यांनी प्रास्तावीक केले.

मधुसुदन रुंगठा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या चंद्रपूर मध्ये स्वंयरोजगाराच्या खूप संधी उपलब्ध आहेत. तसेच विविध कंपन्या चंद्रपूर मध्ये सुरू होणार आहेत त्यामुळे नोकरी साठी पुणे-मुंबई जाता इथेच नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. रविंद्र लाखे यांनी स्वंयरोजगाराचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. अवनितकुमार जोशी यांनी छोटया व्यवसाय सुरू करण्याबाबत मार्गदर्शन केले. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देवून त्यांचे समाधान केले तसेच उपस्थिती मान्यवरांनी

विद्यार्थ्यांसोबत यशस्वीरित्या संवाद साधून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमध्ये मान्यवर आणि विद्यार्थी यांचेसोबत संवाद प्रा. एन. डब्ल्यू. पठाण यांनी साधला.. संचालन प्रा. ए. एन. ठाकरे, आभार प्रा.ए. आर. बहाले यांनी केले. सर्व विभागाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागप्रमुख प्रा. एन. डब्ल्यू. पठाण, प्रा. जे. बी. भोयर, प्रा. एस. एम. ढेंगळे, प्रा. एस. एस. सरकाटे, प्रा. एम. ए. तांबोली, प्रा. जी. एस. पाकमोडे, प्रा. के.जी. सिंग, प्रा.व्ही. पी. सारणे, प्रा. ए. एच. खान, प्रा. निलेश बेलखेडे (पी.आर.ओ.) तसेच सर्व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.