जल जीवन मिशन अंतर्गत कामे तातडीने पूर्ण करावीत–जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड:–जल जीवन मिशन अंतर्गत मागे पडलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. यासाठी संबंधित विभागांने आणि नियुक्त सल्लागार संस्था यांनी प्राधान्याने कार्यवाही मधील त्रुटी दूर कराव्यात असे आदेश जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी केले.जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतीच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस पी वेंगुर्लेकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शुभांगी नाखले, जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे गट विकास अधिकारी , उप अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नाबार्ड व जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत विविध विषयाबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रधानमंत्री यांच्या वतीने प्राधान्याने लक्ष देण्यात येत असलेल्या “जल जीवन मिशन” व “हर घर नल” या प्रमुख योजना बाबत तपशीलवार आढावा घेण्यात आला.तालुका निहाय कामांच्या प्रगतीची माहिती घेण्यात आली. जल जीवन मिशन अंतर्गत १२८८ कोटी रुपये खर्च आराखडा असून १४२२ कामे मंजूर आहेत.त्यापैकी 381 कामांची प्रगती ० ते २५ टक्के दिसून आली. डिसेंबर अखेर यातील सर्व काम पूर्ण करणे अपेक्षित असल्याने कामांच्या प्रगतीमुळे सदर महत्त्वपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीवर परिणाम होत आहे. यात अजिबात सुरू न झालेल्या कामांमध्ये तातडीने कार्यवाही होणे अपेक्षित असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
संबंधित विभागांचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांनी नियम व कार्यादेशातील तरतुदीच्या आधारे जलजीवन मिशन मधील कामे पूर्ण करणे अपेक्षित आहे. कामे निर्धारित कालावधीत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या.पनवेल , महाड व कर्जत या तालुक्यातील कामांची प्रगती कमी आहे असे आढळून आले.यावेळी बैठकीत “हर घर नल” मधील एकूण 1831 पैकी 926 कामे पूर्ण असून 457 गावातील नळजोडणी भौतिक व आर्थिक दृष्ट्या पूर्ण होणे बाकी आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावात प्रत्येक घरात शंभर टक्के नळ जोडणी करणे अपेक्षित आहे.