दिवसाढवळ्या दीड लाखाची धाडसी चोरी
अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
8830857351
राजुरा, 28 ऑक्टोबर: तालुक्यातील चनाखा गावात दिवसाढवळ्या दीड लाखाची चोरी करण्यात आली आहे. तक्रारीवरून विरूर पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चनाखा गावात दिनेश रामटेके यांचे विहिरगाव रस्त्यावर घर आहे. 26 ऑक्टोबर रोजी दिनेश शेती साठी मोटार पंप घेण्यासाठी मुलला गेले होते. व त्यांची पत्नी घराला कुलूप लावून शेतात गेली. घर कुलूपबंद असल्याची संधी साधून चोरट्यांने कुलूप तोडून घरात प्रवेश केला व आलमारीमधील 1 लाखाची रोकड व सोन्याच्या अंगठ्या, नथ, पोत व चांदीच्या पायपट्या असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला. दिनेश यांची मुलगी घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, याआधी त्यांच्या घरी कापसाची चोरी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
चोर हा गावातील असल्याची चर्चा आहे. दिवसाढवळ्या चोरीची घटना घडल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. घरमालक दिनेश रामटेके यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विरुर पोलिस करीत आहे