कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेचे महत्व कोजागिरी पौर्णिमा कथा कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करतात…..

52
कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेचे महत्व कोजागिरी पौर्णिमा कथा कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करतात.....

कोजागिरी पौर्णिमा
कोजागिरी पौर्णिमेचे महत्व
कोजागिरी पौर्णिमा कथा
कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करतात…..

कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेचे महत्व कोजागिरी पौर्णिमा कथा कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करतात.....

सचिन पवार ✍️

कोकण ब्युरो चीफ

📞8080092301📞✍️

कोकण :-‘कोजागिरी…. हू जागिरी’….म्हणत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करुन मस्त बेत आखला जातो. इतकीच या दिवसाची ओळख आपल्याला आहे. मस्त मसाला दूध, सोबत रास गरबा असा आनंद तुम्ही देखील नक्कीच घेतला असेल पण कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मात मोठे महत्व आहे. कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा सण असून हा सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये येतो. दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो. हिंदू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मातही या दिवसाला महत्व आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्यांसाठीही हा दिवस महत्वाचा आहे. कोजागिरी पौर्णिमा ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. याला ‘शरद पौर्णिमा’, ‘माणिकेथारी’, ‘नवान्न पौर्णिमा’ , कौमुदी पौर्णिमा, ‘माडी पौर्णिमा’ असे देखील म्हणतात. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नेमकं काय? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा माहिती मराठी कोजागिरी पौर्णिमेचे महत्व जाणून घेऊया. शिवाय हा सण नेमका कसा साजरा करायचा ते देखील जाणून घेऊया. कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा करु शकता.

कोजागिरी पौर्णिमेचे महत्व
कोजागिरी पौर्णिमा कथा
कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करतात कोजागिरी पौर्णिमेचे महत्व
कोजागिरी पौर्णिमा साजरी का केली जाते हा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. यासाठीच जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमेचे महत्व काय आणि कोजागिरी पौर्णिमा माहिती मराठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो. त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त पडते. हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याचे म्हटले जाते. खगोलशास्त्रीय दृष्ट्या या दिवसाला फारच जास्त महत्व दिले जाते.प्राचीन आणि पौराणिक काळाचा विचार करताही या दिवसाला फारच जास्त महत्व आहे. कोजागिरी पौर्णिमेेच्या आधी नऊ दिवसाची नवरात्र आलेली असते. या नऊ दिवसात शक्ति आणि बुद्धीची देवता पार्वती व तिच्या वेगवगेळ्या रुपांची मनोभावे पूजा करतो. विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी विजय संपादनासाठी विजयादशमी साजरी केली जाते. याला सीमोल्लंघन देखील म्हणतात. त्यानंतर येणाऱ्या या पौर्णिमेपर्यंत शेतीची कामे देखील अर्ध्यावर आलेली असतात. पावसाळा संपून नवी पिके हाताशी आलेली असतात. त्यामुळे याचाही आनंद या दिवशी साजरा केला जातो.कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वगवेगळ्या धारणा आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे एक वेगळे महत्व आहे. दमा आणि अस्थमा असणाऱ्यांसाठीही आजचा दिवस फारच महत्वाचा आहे. दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे. मग दूध प्यावे. या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलते. ज्याचा फायदा तुम्हाला होतो. थंडीला या काळात सुरुवात होऊ लागते. त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो. असे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते.

कोजिगिरी पौर्णिमा तारीख आणि वेळ कोजागिरी पौर्णिमेचे महत्व जाणून घेतल्यानंतर ती कधी येते हे जाणून घेऊ. कोजागिरी पौर्णिमा ही दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. यंदा म्हणजेच 2021 मध्ये ही कोजागिरी पौर्णिमा 19 ऑक्टोबर रोजी आली आहे. पौर्णिमेचा प्रारंभ हा सायंकाळी 7 वाजून 3 मिनिटांनी सुरु होणार आहे. पूर्ण चंद्र आल्यानंतर तुम्ही चंद्रासमोर मसाला दूध ठेवून त्याचे सेवन केले जाते. लक्ष्मी पृथ्वीतलावर येणार याचे स्वागत करण्यासाठी जागे राहण्याची फार पूर्वी पासूनची परंपरा आहे.कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेसंदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात. यापैकी काही कथा जाणू घेऊया. म्हणजे तुम्हाला कोजाागिरी पौर्णिमेचे महत्व जास्त कळेल.

एका राजाची कथा यामध्ये सांगितली जाते. एक राजा काही कारणामुळे आपले सगळे वैभव आणि संपत्ती गमावून बसतो. आपली संपत्ती पुन्हा मिळवण्यासाठी राणीने महालक्ष्मीचे व्रत केले. तिच्या व्रतामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न झाला आणि तिला आशीर्वाद मागण्यास सांगितले. तिने आपले राजवैभव परत माागितले. तिला ते वैभव परत मिळाले. कोजागिरी पौर्णिमेच्या या दिवशी मध्यरात्री चंद्रमंडलातून उतरुन साक्षात महालक्ष्मी खाली पृथ्वीतलावर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात ‘अमृतकलश’ घेऊन येते आणि सगळ्यांना विचारते ‘को जार्गति? को जार्गति?’ तिने आणलेल्या अमृत कलशामध्ये असलेले ज्ञान, वैभव देण्यासाठीच ती आलेली असते. जे लक्ष्मीला साद देतात तिला ही सुखसमृद्धी मिळते.फार फार वर्षांपूर्वीची गोष्टी मगध नावाच्या राज्यात वलित नावाचा एक सुसंस्कृत परंतु गरिब ब्राम्हण राहात होता. जो एवढा सज्जन होता. त्याची पत्नी तितकीच दृष्ट होती. ब्राम्हणाच्या गरिबीमुळे ती सतत त्याला त्रास देत होती. गरिबीमुळे त्रासलेल्या ती पत्नी ब्राम्हणाला नको नको ते बोलत होती. पतीच्या विरोधातील त्याचे आचरण पाहून त्याला त्रास होत असे. चोरी सारख्या वाईट कामांसाठीही ती त्याला प्रवृत्त करु लागली. एकदा एक पूजा करताना तिने या पूजेमध्ये व्यत्यय आणून ती पूजा पाण्यात फेकून दिली. चिडलेल्या आणि थकलेल्या ब्राम्हणाने जंगलात निघून जाणे पसंत केले. जंगलात गेल्यावर त्यांना काही नागकन्या भेटल्या त्यांनी त्या गरिब ब्राम्हणाला त्या दिवसाचे महत्व सांगितले. तो अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा होती. तिने ब्राम्हणाला कोजागिरी व्रत करण्यास सांगितले. त्याने विधीवत कोजागरी व्रत केले. त्याला सुख-समृद्धी मिळाली.लक्ष्मीच्या कृपेने त्याची पत्नीही चांगली सुबुद्धी झाली. त्यांचा संसार सुखाचा झाला कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करतात कोजागिरी पौर्णिमेेचे महत्व जाणून तुम्ही तो दिवस नेमका कसा साजरा करायचा याचा विचार करत असाल तर जाणून घ्या या दिवसाचा पूजाविधी.पूजाविधी : या दिवशी देवी महालक्ष्मीची पूजा करण्याची खूप ठिकाणी पद्धत आहे. यासाठी तुम्ही स्वच्छ स्नान करुन घ्या. उपवास ठेवा. तांब्याच्या, चांदीच्या किंवा मातीच्या कलश्यावर वस्त्राने झाकलेली लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी आणि मनोभावे पूजा करावी. चंद्रोदय झाल्यावर तूपाचे दिवे लावावेत. दूध, तूप आणि ड्रायफ्रुट्स घालून खीर बनवावी. ती चंद्र प्रकाशात ठेवावी त्यानंतर अशी खीर प्रसाद म्हणून ब्राम्हणास द्यावी आणि आपणही ग्रहण करावी .कोजागिरीच्या दिवशी घरातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून अश्विनी साजरी केली जाते. घरी मस्त मसाला दूध बनवले जाते. सुकामेव्यात आटवलेले गोड दूध चंद्रप्रकाशात न्हाऊन काढले जाते. मग ते प्राशन केले जाते. मंगलमय गाणी,रास गरबा करुन ही रात्र जागवली जाते.अशा पद्धतीने तुम्ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करु शकता आणि या दिवसाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.