प्रेक्षकांचा आवडता ‘चला हवा येऊ द्या’ शो होणार कायमचा बंद! शो बंद होण्यामागील खरं कारण आलं समोर…

प्रेक्षकांचा आवडता ‘चला हवा येऊ द्या’ शो होणार कायमचा बंद! शो बंद होण्यामागील खरं कारण आलं समोर…

प्रेक्षकांचा आवडता ‘चला हवा येऊ द्या’ शो होणार कायमचा बंद! शो बंद होण्यामागील खरं कारण आलं समोर…

हिरामण गोरेगावकर

मराठीतील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. गेल्या काही वर्षांत शोची लोकप्रियता कमी झाल्यामुळे शोचा टीआरपीही खालच्या पातळीवर गेला. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

या शोचा शेवटचा भाग येत्या आठवड्यात शूट केला जाणार आहे. या एपिसोडचे सूत्रसंचालन डॉ. निलेश साबळे यांनी केले. कुशल बद्रिके आणि भाऊ कदम हे त्यांचे साथीदार होते. त्याला एक वेगळी ओळख देण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली.
हा भाग प्रेक्षकांना आवडला. अवघ्या 12 तासांत तयार झालेल्या या कार्यक्रमाला नंतर ‘चला हवा येऊ द्या’चे स्वतंत्र रूप देण्यात आले. हा कार्यक्रम सुरुवातीपासूनच लोकप्रिय राहिला.
भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांच्यासोबत सुरू झालेला हा कार्यक्रम मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही गाजला.
दरम्यान, हा शो अलीकडे निस्तेज झाल्याची तक्रार प्रेक्षक करत होते.

याबाबत नीलेश साबळे म्हणाले की, या कार्यक्रमाने गेल्या नऊ वर्षांपासून हजाराहून अधिक भागांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या कार्यक्रमाने माझ्यासह संपूर्ण टीमला नाव, ओळख, आर्थिक स्थिरता दिली.

आम्ही सध्या थांबत आहोत, असे चैनलने म्हटले आहे. पण, सात-आठ महिन्यांनंतर पुन्हा नवा हंगाम सुरू होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे आता नवा हंगाम कधी येणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here