अंमली पदार्थाची तस्करी करणारे गजाआड
•स्थानिक गुन्हे शाखेची प्रशंसनीय कारवाई
•28 लाखाचा मुद्देमाल जप्त
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर, 31 ऑक्टोबर
जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी करणार्यांचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. आरोपींकडून 28 लाख 2 हजार 700 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई पडोली पोलिस ठाणे हद्दीत चंद्रपूर-नागपूर महामार्गावर स्थानिक गुुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी केली.
शाहरूख मतलुब खान, साहिल इजराइल शेख असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून अंमली पदार्थ, भ्रमणध्वनी, तलवार, चारचाकी वाहन, रोकड असा एकूण 28 लाख 2 हजार 700 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक महेश कोंडावार, सहाय्यक पोलिस निरिक्षक नागेश चतरकर, पोलिस उपनिरिक्षक विनोद भूरले, अतुल कावळे, धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, प्रशांत नागोसे, भूषण बारसिंगे, छगन जांभूळे यांच्या पथकाने केली.