राजूरा येथे अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

49
राजूरा येथे अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

राजूरा येथे अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

राजूरा येथे अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

राजूरा:- राजूरा येथे आशा समूह, राजूरा द्वारा अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस वर्धापनदिनाचे आयोजन करण्यात आले. अल्कोहोल अॅनाॅनिमस म्हणजे अनामिक मद्यपी ही पुरुष व स्त्रियांची एक संघटना आहे. ह्या संघटनेतील सभासद आपले व्यक्तिगत अनुभव एकमेकांना सांगतात की, त्यामुळे सर्व सभासदांचे मानसिक धैर्य वाढते व नव जीवनाची आशा स्फूरते. अशा तऱ्हेने सभासद आपले स्वत: चे तसेच एक दुसर्याचे प्रश्न सोडवितात आणि दारू पासून दूर राहतात, ह्या संघटनेत सामील होण्यास फक्त एकच अट आहे की, मद्याच्या आजारातून मुक्त होण्यास सभासदाची इच्छा असली पाहिजे. संघटना सामाजिक अथवा राजकीय तत्वांचा प्रचार करीत नाही. संघटनेचे ध्येय एकच आहे की, मदयापासून स्वत: ला दूर ठेवणे आणि ज्यांना दारू पासून मुक्ती मिळवायची इच्छा आहे अशा इतर मदयपीडीत सदस्यांनी दहा वर्षापासून राजूरा शहरात आशा समूह राजूरा द्वारा अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते, यावर्षी ही 11व्याअल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. ओमप्रकाश गौड ,तहसीलदार राजूरा यांनी आपल्या मार्गदर्शनातून म्हटले की, मद्यपाश हा एक घातकी आजार आहे तरी ए. ए. सदस्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. तसेच श्री. शुध्दोधन निरंजने मु. अ. शिवाजी नाईट हायस्कूल यांनी आपल्या मार्गदर्शनातून म्हटले की, आपण आपल्या काटेकोर व निर्भय पणे आपल्या आयुष्यातील गुण दोषांची नोंद करून स्वभावदोष दूर करावेत. तसेच आपले

स्वत :चे व समूहाचे स्वातंत्र्य आहे मात्र त्यामुळे इतर समूहाचे अथवा ए. ए. समूहाचे नुकसान होता कामा नये, आणि मद्याच्या व्यसनाने त्रासलेल्यांना या व्यसनातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवावे असे मत व्यक्त केले.
श्री. भास्कर पी यांनी बारा पायर् याचे वाचन केले, श्री. स्वप्नील डी यांनी बारा रूढीचे वाचन केले, श्री. विनोद, स्नेहल, स्वप्नील यांनी आत्मकथन केले, श्री. शामसुंदर भाऊ यांनी अल्कोहोलिक अॅनानिमस इतिहासाचे वाचन केले, श्री. कमलेश भाऊ यांनी मद्यपान आजाराबद्दल महत्व सांगितले, श्री. कपील टी यांनी विक्री बद्दल माहिती दिली, श्री. महेश के प्रतिबिंब बद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश डी यांनी केले तर प्रास्ताविक श्री. विठ्ठल के यांनी केले, व आभार श्री. मनोज टी यांनी केले, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व अल्कोहोलिक अॅनानिमस सदस्यांचे सहकार्य लाभले आणि सर्व ए. ए. समूहाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.