“भावी खासदार’’ माधवीताई नरेश जोशी कोण आहेत?

57
“भावी खासदार’’ माधवीताई नरेश जोशी कोण आहेत?

कर्जतमधील भावी खासदार माधवीताई नरेश जोशी, राजकारणातील एक तरुण, समाजाप्रती जिव्हाळा चेहरा म्हणून उदयास येत आहेत.

“भावी खासदार’’ माधवीताई नरेश जोशी कोण आहेत?

संदेश साळुंके

सातारा जिल्ह्यातील बिलासपूर येथे जन्मलेली तरुणी आपल्या समाजसेवी उपक्रमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजघराण्याशी जोडली जाते. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सार्वजनिक उपक्रमात सहभागी होणाऱ्या माधवीताई आता छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्याच्या सून आहेत. आपल्या प्रतिष्ठानचे माध्यमातून रायगड आणि पुणे जिल्ह्यात सामाजिक बांधिलकीचे भावनेने कार्य सुरू आहे. छत्रपती उदयनराजे यांच्या सहवासात समाजसेवेचे बाळकडू घेतलेल्या माधवीताई या खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या तालमीत सामाजिक कार्य करण्यासाठी तावून सुलाखून तयार झाल्या आहेत.सातारा जिल्ह्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना झाडे देऊन त्या झाडांचे वाढदिवस दुसऱ्या वर्षे साजरे करायला जाणाऱ्या म्हणून माधवीताई यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. शाळांमध्ये हरित ग्रुप स्थापन करून त्या मुलांमध्ये रममाण होणाऱ्या माधवीताई दहा वर्षानंतर आजही सातारा येथे जावून झाडांचे वाढदिवस साजरा करतात आणि पर्यावरण दिन साजरा करतात. दुसरीकडे पक्षी आणि प्राणी यांना उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मिळावे यासाठी माधवीताई यांनी सातारा जिल्ह्यातील जंगलात पाण्याचे हौद तयार केले होते.तसे बशीच्या आकाराचे हौद आता कर्जत तालुक्यातील मोर आणि माकड, वानर यांच्यासाठी उभारण्याचे काम सौ माधवीताई नरेश जोशी प्रतिष्ठान कडून हाती घेण्यात आले आहे.अशा वन्यप्रेमी आणि पर्यावरण स्नेही माधवीताई जोशी यांच्या कार्याला जनता शुभेच्छ देत आहेत.

रायगडात आल्यानंतर समाजसेवेची आवड असल्याने पती नरेश सदानंद जोशी यांच्या प्रेरणेने माधवीताई नरेश जोशी प्रतिष्ठानचे माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम यांच्या माध्यमातून लोकप्रिय बनल्या आहेत.सामाजिक,कला,क्रीडा, शैक्षणिक आदी क्षेत्रात कार्य करणाऱ्या माधवीताई जोशी प्रतिष्ठान कडून अनाथांना मदतीचा हात दिला जातो. तर हुशार असून पैशाअभावी शिक्षण घ्यायचे अडचणी येतात अशा विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य करण्याचे काम आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे काम प्रतिष्ठान कडून केले जाते.रायगड जिल्हास्तरीय रात्र क्रिकेट सामने,आपल्या मराठी माती मधील रांगडा खेळ म्हणून ओळख असलेल्या कुस्तीला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय कुस्तीचा जंगी सामने भरवून महाराष्ट्र उप केसरी सारख्या कुस्तीपटू यांच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्याचे काम सौ माधवीताई जोशी प्रतिष्ठान कडून करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या संचालिका असलेल्या माधवीताई यांनी आदिवासी आदिम जमातीचे प्रश्न आपले समजून त्या प्रश्नांना स्वखर्चाने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा कर्तृत्ववान महिलेचा सन्मान होत असताना आनंद होत आहे. साताराने दिली ओळख, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजघराण्याचा वारसा सांगणारा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे.तेथील मूळ रहिवाशी असलेल्या माधवीताई यांची आपल्या कुटुंबासमवेत वडिलांसोबत इकडून तिकडे भटकंती सुरू असायची.सरकारी नोकरीत असलेल्या वडिलांच्या दर दोन चार वर्षांनी होणाऱ्या बदल्या याचा एक फायदा माधवीताई या छत्रपती उदयनराजे यांच्या संपर्कात आल्या.पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या माधवी ताई यांनी छत्रपती उदयनराजे यांच्या प्रतिष्ठान कडून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमात सहभागी होत आपली समाजसेवेची आवड जपण्यास वाढविण्यास सुरुवात केली.रस्त्याने गाडी जरी जाणार असेल तरी छत्रपतींना मुजरा करण्यासाठी शेकडोने जमणारी गर्दीला उदयनराजे यांच्या एका छबीचे आकर्षण राहिले आहे,तेथे माधवीताई यांना राजेंच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे माधवीताई यांचे जीवनच बदलले.समाजात लाजरी असणारी मुलगा छत्रपती उदयनराजे यांच्या सहवासात येते आणि त्यातून समाज सेवेची आवड जोपासत अनेक जनोपयोगी कार्यात आघाडीवर राहून स्वतःच्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या माधवीताई या रायगडात आल्यानंतर झपाटल्यागत कार्य मावळ प्रांतात सुरू केले आहे.तेथे वन्यजीव आणि वृक्ष लागवड चळवळ म्हणून अंगिकारत सातारा जिल्ह्यातील अनेक शाळा महाविद्यालयात वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न माधवीताई यांनी केला आहे. झाडांचे वाढदिवस साजरे करतात, सातारा जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेज मध्ये माधवीताई यांनी वृक्ष लागवड चळवळ सुरू केली.ही चळवळ एवढी वाढली की दहा वर्षांनंतर देखील तेथे झाडांचे वाढदिवसाचे साजरे केले जात आहेत.

कर्जत तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश !

यावर्षी मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविद्यालय आणि शाळांमध्ये देखील अशी चळवळ माधवीताई जोशी प्रतिष्ठान कडून राबविली जाणार आहे.त्यासाठी प्रमुखाने उरण,कर्जत,खालापुर आणि पनवेल तालुक्यात कृषी दिनापासून शाळा शाळांमध्ये जावून झाडांचे महत्व पटवून देण्याचे काम प्रतिष्ठान करणार आहे.त्याचवेळी हरित गट स्थापन करून समूह शेती तत्वावर उत्पन्न देणाऱ्या झाडांची लागवड बचत गटांना सोबत घेवून सातारा प्रमाणे रायगड जिल्ह्यात सुरू केले आहे. वृक्ष लागवड करून न थांबता त्या वृक्षाचे वाढदिवस साजरे करण्याची संकल्पना आणि त्या त्या झाडांना स्वतःच्या नावे ओळख देण्याची संकल्पना माधवी जोशी यांची असल्याने आपण स्वतः लावलेल्या झाडांचे संगोपन देखील करण्याची परंपरा सुरू झाली आहे. क्रिडा चळवळीला प्रोत्साहन तरुणांना क्रिडा क्षेत्रात मानाचे स्थान मिळविता यावे यासाठी माधवी जोशी यांनी नेरळ येथे ठाणे आणि रायगड तसेच पुणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी रात्र क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती.चार दिवसांच्या स्पर्धेसाठी लाखोंची बक्षिसे असल्याने मुंबई पासून पुण्यापर्यंतचे खेळाडू सहभागी झाले होते.त्या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद बघून भावी खासदार चषक कुस्ती स्पर्धा चौक खालापूर येथे भरविली.राज्यातील कानाकोपऱ्यातील खेळाडूंनी सहभाग घेतलेली ही स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूंसाठी चांदीचा गदा भेट देण्यात येणार होती आणि त्यामुळे महारष्ट्र उप केसरी पासून नामवंत मल्ल सहभगु झाले होते.पावसाळ्यात तालुका पातळीवर कॅरम, बुद्धिबळ अशा स्पर्धा भरविण्याचे नियोजन असून तालुका स्तर आणि नंतर जिल्हा आणि नंतर राज्य स्तरावर या स्पर्धा खेळविण्याचा माधवीताई नरेश जोशी प्रतिष्ठानचे मुख्य उद्दिष्ट आहे.तर शाळांमध्ये खेलाविल्या जाणाऱ्या स्पर्धेतून राष्ट्रीय पातळीवर खेलविल्या जाणाऱ्या खेलो इंडिया साठी हे प्रतिष्ठान स्पोंसर्शिप देणार आहे. अनाथांना आधार समाजातील अनाथ मुलांना आणि आई वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांना,गरीब असून शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या मुलांना आर्थिक आधार देण्याचे काम माधवी ताई नरेश जोशी प्रतिष्ठान करीत असते.या प्रतिष्ठान कडून कर्जत,खालापूर आणि उरण तालुक्यांतील विद्यार्थ्याना आर्थिक मदत करून तर अनेक मुलांसाठी दत्तक योजना प्रतिष्ठान कडून राबविली जात आहे.

माधवी ताई जोशी युवा प्रतिष्ठानच्या विशेष सहकार्यातून गोरगरिबांच्या दिवाळीचा गोड शुभारंभ…

शैक्षणिक क्षेत्रात कार्य करताना या दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा येत्या शनिवार पासून सुरू होत असून मावळ प्रांतातील प्रत्येक तालुक्यात असा सोहळा साजरा होत असताना विद्यार्थ्यानं प्रोत्साहनपर अर्थ सहाय्य पारितोषक वितरण सोहळ्यात देण्याचे नियोजन आहे. स्थानिक समस्यांना मार्ग आदिवासी आणि ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी माधवी ताई नरेश जोशी प्रतिष्ठान कडून भरीव काम सुरू आहे.त्यात गावातील अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेले रस्ते बनविणे,पाण्याची व्यवस्था करणे, पाणी साठवण ड्रम यांचे वाटप करताना पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रतिष्ठान कडून कार्य सुरू आहे. आदिवासीं लोकांच्या हक्काच्या ताई आदिवासी कुटुंबातील कर्ता व्यक्तीच्या निधनानंतर आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेल्या कुटुंबाला आर्थिक स्थिरता देण्यासाठी मदत आणि त्या कुटुंबातील मुलांची शिक्षणाची व्यवस्था माधवीताई नरेश जोशी प्रतिष्ठान कडून केली जात असल्याने आदिवासी समाजासाठी माधवीताई अडचणीच्या वेळी धावणाऱ्या हक्काच्या ताई बनल्या आहेत.शिक्षणाची चळवळ शिक्षण क्षेत्रात छत्रपती शिवाजी विद्यापीठ मध्ये संचालिका पदावर सेवा देत असलेल्या माधवी जोशी या आणखी एका मोठया शैक्षणिक संस्थेत जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयारी करीत आहेत.त्या कार्य करीत असलेल्या संस्थेत रायगड आणि मावळ प्रांतातील विद्यार्थ्यांना देखील चांगले आणि उच्च शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होणार आहे.महिला वर्गासाठी नियोज समाजातील कुटुंब चालविणाऱ्या महिलांना कायमस्वरूपी आणि हक्काचा रोजगार देण्यासाठी खालापूर तालुक्यातील एखादी बंद कारखाना किंवा कंपनी खरेदी करून त्या ठिकाणी महिलांना रोजगार देणारे उत्पादन निर्माण करणेसाठी नरेश जोशी यांच्या कडून प्रयत्न सुरू असून त्या ठिकाणी काही हजार महिलांना रोजगार देवून सक्षम करण्याचे उद्दिष्ट प्रतिष्ठान ने ठेवले आहे. आरोग्य क्षेत्रात जेनरिक औषध उत्पादन गरीब रुग्णांना परवडतील अशी जेनरिक औषधे यांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळें जेनरिक औषधे यांचे उत्पादन वाढविण्यासाठी औषध कंपन्या यांच्याबरोबर करार करून उत्पादन वाढीसाठी पुढाकार घेण्याबाबत नरेश जोशी आणि माधवी नरेश जोशी यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. पत्रकारांना पेन्शन देण्याचा विचार महाराष्ट्रात शासन ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन देत असुन मावळ प्रांतातील ज्येष्ठ पत्रकार यांना माधवीताई नरेश जोशी प्रतिष्ठान कडून पेन्शन देण्याबाबत विचार सुरू आहे. त्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातील गेल्या ५० वर्षात कार्यरत असलेले पत्रकार यांचा डाटा संकलनाचे काम सुरू असून नजीकच्या काळात अशी पेन्शन योजना लागू करणे हे प्रतिष्ठान चे आणखी एक नियोजन आहे.