ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या जेम पोर्टल कार्यशाळेस उदंड प्रतिसाद गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस पोर्टलमुळे शासकीय खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता व गतिमानता

52
ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या जेम पोर्टल कार्यशाळेस उदंड प्रतिसाद गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस पोर्टलमुळे शासकीय खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता व गतिमानता

ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या जेम पोर्टल कार्यशाळेस उदंड प्रतिसाद

गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस पोर्टलमुळे शासकीय खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता व गतिमानता

ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या जेम पोर्टल कार्यशाळेस उदंड प्रतिसाद गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस पोर्टलमुळे शासकीय खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता व गतिमानता

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

कर्जत :- शासकीय कार्यालयांना लागणारे साहित्य व सेवा घेण्यासाठी केंद्र शासनाने शासकीय ई-बाजार अर्थात गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (Gem) पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलमुळे खरेदी प्रक्रिया गतिमान व पारदर्शक झाली असून शासकीय कार्यालयांना दर्जेदार साहित्य उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले.

केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (Gem) पोर्टलचा अधिकाधिक वापर करून शासकीय कार्यालयांनी वस्तू व सेवांची खरेदी करण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्र ठाणे यांच्यातर्फे शासकीय कार्यालयातील विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा नियोजन समिती सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. शिनगारे बोलत होते.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखा अधिकारी मयुर हिंगणे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त धैर्यशिल जाधव, कोकण विभागाच्या उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ, ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सीमा पवार, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्यासह शासकीय, निमशासकीय तसेच स्वायत्त संस्थेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, शासकीय खरेदी धोरणानुसार शासकीय कार्यालयांना खरेदी करणे आता जेम पोर्टलमुळे सोपे झाले आहे. तसेच जेम पोर्टलवर पारदर्शकतेमुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी हे तणावातून मुक्त झाले असून मानसिक शांती मिळाली आहे. जेम पोर्टलमुळे मेक इन इंडिया धोरणालाही मोठे योगदान प्राप्त झाले आहे. शासकीय कार्यालयांना लागणारे साहित्य जेम पोर्टलवरून खरेदी होत असल्याने कामकाजात गतिमानता प्राप्त झाली असून परवडणाऱ्या दरात दर्जेदार साहित्य मिळत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांनी जेम पोर्टलचा वापर करून खरेदी प्रक्रिया राबवावी. ज्यांनी अद्याप जेम पोर्टलवर नोंदणी केली नाही, त्या कार्यालयांनी येत्या आठ दिवसात नोंदणी करावी.
उद्योग सहसंचालक श्रीमती विजू शिरसाठ यांनी राज्य शासनाच्या खरेदी धोरणाविषयी माहिती दिली. या धोरणातील तरतुदी, खरेदी करताना अवलंबवायची प्रक्रिया, जेम पोर्टलचा फायदा याविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली. त्या म्हणाल्या की, जेम पोर्टलवरील खरेदी मध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात अव्वल स्थानावर आहे. जेम पोर्टलचा वापर केल्याबद्दल राज्याला तीन पुरस्कार मिळाले आहेत. या पोर्टलवरील खरेदी प्रक्रिया सुटसुटीत असून शासकीय कार्यालयांना फायदेशीर आहे. तसेच या पोर्टलमध्ये एमएसएमई, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या उद्योजकांकडून वस्तू खरेदी करण्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांनी आता जेम पोर्टलवरूनच खरेदी करण्याचे बंधन घालण्यात येणार आहे. जास्तीत जास्त कार्यालयांनी जेम पोर्टलवरून खरेदीसाठी पुढाकार घ्यावा.
जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सीमा पवार यांनी जेम (Gem) पोर्टलविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या की, जेम पोर्टलवर होणारी खरेदी प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया असून ती मानवी हस्तक्षेपाशिवाय होणार आहे. या पोर्टलचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे. जेम पोर्टलसंबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र संपूर्ण सहकार्य करणार आहे.
यावेळी केंद्र शासनाच्या जेम पोर्टलसंबंधीचे नोडल अधिकारी निखिल पाटील, शैलेश जाधव यांनी जेम पोर्टलवरील नोंदणी, खरेदी प्रक्रिया, ई निविदा यासंदर्भात सविस्तर सादरीकरण केले.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. सानप यांनी यावेळी ही कार्यशाळा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. तसेच जास्तीत जास्त शासकीय कार्यालयांचे जेम पोर्टलवर नोंदणी व्हावी, यासाठी येत्या काळात यासंबंधीचे शिबिर आयोजित करण्याची विनंती आयोजकांना केली.