मी शुद्र असल्यामुळेच सुप्रिया सुळेंकडून लक्ष्य केले जाते”, सुनील तटकरे असे का म्हणाले….
सुप्रिया सुळे माझा महासंसद रत्न असा उल्लेख का करतात मला माहीत नाही. मी ज्या समाजातून आलो किंवा कदाचित मी शुद्र असल्यामुळे त्या मला लक्ष्य करत असाव्यात, असे सुनील तटकरे म्हणाले.
हिरामण गोरेगावकर
नागपूर : सुप्रिया सुळे माझा महासंसद रत्न असा उल्लेख का करतात मला माहीत नाही. मी ज्या समाजातून आलो किंवा कदाचित मी शुद्र असल्यामुळे त्या मला लक्ष्य करत असाव्यात, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नागपूर येथे पत्रकार परिषदेत म्हणाले.
सुनील तटकरे रविवारी नागपूरमध्ये होते. पक्षाच्या मेळाव्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. सुप्रिया सुळे माझ्यावर गेल्या काही दिवसांत सॉफ्ट टार्गेट म्हणून टीका करत असतील. ‘एखादा व्यक्ती’ असा माझ्याबाबत उल्लेख करणे भूषणावह नाही. त्यांचा काय राग आहे मला माहीत नाही. दिल्लीत सुनावणी असताना संताप अनावर झाला. कोणी काय चाट केले, मला माहीत आहे, माझी नियत साफ आहे. अनेक वर्षं त्यांच्यासोबत काम केले. मात्र मी शुद्र असल्याने कदाचित त्या माझा राग करत असतील. मात्र आता त्यांच्या वक्तव्याला प्रतिसाद देत नाही, असेही तटकरे म्हणाले.