धम्मकिर्ती बुद्ध विहारचा ‘टिन शेड’ लोकार्पण सोहळा संपन्न
• सुभाष कासनगट्टूवार, माजी नगरसेवक चंद्रपूर मनपा, यांच्या हस्ते लोकार्पण
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर : 6 नोव्हेंबर
राष्ट्रवादीनगर येथील धम्मकिर्ती बुद्ध विहारचा ‘टिन शेड’ लोकार्पण सोहळा रविवार, ५ ऑक्टोबर रोज सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी संपन्न झाला. सुभाष कासनगट्टूवार, माजी नगरसेवक मनपा, चंद्रपूर यांच्या हस्ते टिन शेडचे लोकार्पण करण्यात आले. उद्धव ठेमस्कर यांच्या कुशल व शिस्तबद्घ मार्गदर्शनाखाली आणि जितू वाकडे , विवेक कांबळे , दीलखुश भडके यांच्या मोलाच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
यावेळी देवगडे सर , निरंजने सर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून राष्ट्रवादीनगर येथील ५ ज्येष्ठ बौद्ध उपासक – उपासिका, पेटकर, हिम्मतलाल भडके, लीला रामटेके, मीरा पाटील, चित्रलेखा ढवळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सुभाष कासनगट्टूवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी कासनगट्टूवार व मारोती साव यांनी यथोचित मार्गदर्शन केले. ठेमस्कर सर यांनी प्रास्ताविक तथा संचालन केले तर माधुरी वाकडे यांनी आभार मानले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राकेश रामटेके, मारोती साव सामाजिक कार्यकर्ता, वृंदावननगर, कमलेश तोडे तुळशिनगर, हिम्मतलाल भडके, माया ठेमस्कर , कुंदा मेश्राम, माला रामटेके, ममता रामटेके, शोभा भडके, आम्रपाली ढोले, साव, जूनघरे, उपाली पाटील तसेच बहुसंख्य उपासक – उपासिका यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.