अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर : 7 नोव्हेंबर
जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे एका अनोळखी पुरुषास रेल्वे स्टेशन, चंद्रपूर येथून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान या व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले. याबाबत रेल्वे पोलीस चौकी, बल्लारपूर येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
• अनोळखी मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे
या व्यक्तीचे वय अंदाजे 65 वर्ष असून उंची 5 फुट 5 इंच, रंग काळासावळा, सडपातळ बांधा, केस बारीक व पांढरे, चेहरा लांबट, नाक सरळ, सर्व दात पडलेले, दाढी मिशी बारीक व पांढरी, तसेच अंगात पांढऱ्या रंगाचे मळकटलेले फुलबाह्याचे शर्ट व दवाखान्याची चादर परीधान केले आहे. या वर्णनावरून या मृतक अनोळखी व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर रेल्वे पोलीस स्टेशन, वर्धा येथे 7499967957 आणि तपासी अंमलदार अन्सार खान यांच्या 9822856786 भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.