कर्जत येथील पत्रकार जगदीश दगडे यांच्या वतीने आदिवासी बालकांना फराळ आणि फटाके वाटप

55
कर्जत येथील पत्रकार जगदीश दगडे यांच्या वतीने आदिवासी बालकांना फराळ आणि फटाके वाटप

कर्जत येथील पत्रकार जगदीश दगडे यांच्या वतीने आदिवासी बालकांना फराळ आणि फटाके वाटप

कर्जत येथील पत्रकार जगदीश दगडे यांच्या वतीने आदिवासी बालकांना फराळ आणि फटाके वाटप

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. फटाके आणि मिठाई यावर हजारो रुपयांची उधळण केली जाते. असे असले तरी समाजातील काही गरीब घटकांच्या घरी आर्थिक ओढाताण असल्याने दिवाळी फराळ वैगेरे केला जात नाही. खास करून वाडी वस्तीत राहणारा आदिवासी समाज आजही दैनदिन गरजा भागवताना सण सूद साजरे करायचे टाळतो. या गोष्टीची जाणीव मनात ठेऊन पत्रकार जगदीश हरिचंद्र दगडे हे दरवर्षी आपल्या कर्जत येथील दहिवली निवासस्थानी दगडे खानावळ येथे जवळील आदिवासी वाडीतील मुलांना फराळ आणि फटाके वाटप करतात.
समाजात अनेक लोक करोडो रुपयांची धनसंपत्ती असूनही गरीब गरजूंना मदत करताना दिसत नाहीत.प रंतु जगदीश दगडे हे स्वत मध्यम वर्गीय असूनही गोर गरिबांना नेहमी मदत करीत असतात. कोरोना काळातही त्यांनी आपल्या जीवाची बाजी लाऊन अनेकांना वैद्यकीय तसेच स्वखर्चाने अन्नदान मदत केली होती. नेहमीच सामाजकार्यायात अग्रेसर असलेले दगडे समजातील विविध घटकांच्या अडचणी सोडवण्यात ते सदैव तत्पर असतात. वाटप केलेले फराळ वाटप उपक्रम असो की इतर कोणत्याही मार्गातून केलेलं सामाजिक कार्य असो यातून कुठला फायदा होत नसला तरी या गोरगरिबांचे आशीर्वाद सदैव पाठीशी असल्याने कोणत्याही अडचणीच्या काळात हेच आशीर्वाद दुवा म्हणून काम करतात. अशी दगडे यांचे धोरण आहे. समाजात आपण वावरताना या समजाचे काही देणे लागतो. या वृत्तीने प्रत्येकाने गोर गरिबांना मदत करावी असे जगदीश दगडे यांनी मत व्यक्त केले.

शनिवारी सायंकाळी जगदीश दगडे यांच्या समवेत भावी खासदार सौ माधवीताई नरेश जोशी आणि सुप्रसिद्ध उद्योजक नरेश जोशी, ज्येष्ठ वकील कैलास मोरे, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वाघमारे, पत्रकार कैलास म्हामले, पत्रकार ज्ञानेश्वर बागडे, पत्रकार रोषन दगडे आणि दगडे यांचे मित्र परिवार उपस्थित होते.