वॉटर पार्कमध्ये शिरला वाघ
• भद्रावती शहरातील बालाजी वॉटर पार्क मधील घटना
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 16 नोव्हेंबर
भद्रावती शहरालगत बालाजी वॉटर पार्कमध्ये बुधवारी रात्री वाघाने प्रवेश केला. तो पहाटे 5 वाजेपर्यंत तिथेच संचार करीत होता. चौकीदार पांडुरंग पारशिवे आणि रमेश कंडे यांनी ही माहिती पार्क मालक भारत नागपुरे यांना भ‘मणध्वनीवरून दिली. नागपुरे यांनी सहकारी प्रशांत डाखरे व अनंता मांढरे यांना सोबत घेऊन खात्री करण्यासाठी सकाळी पार्कमध्ये गेले. तेव्हा वाघाचे सर्वत्र पगमार्क दिसून आले. ही माहिती वन विभागाचे क्षेत्र सहायक विकास शिंदे यांना देण्यात आली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर वाघाचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन वन विभागाने दिले. हा वाघ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. पार्क शहराला लागूनच असल्याने नागरिकांत दहशत आहे.