ठाणे दुकानाला भीषण आग लागली, सिलेंडरचा भीषण स्फोट, 7 जण जखमी

राजेंद्र बिल्ला प्रतिनिधी

ठाणे:- ठाण्यात वागळे इस्टेट परिसरात एका रिक्षाच्या स्पेअर पार्ट्सच्या दुकानाला शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास भीषण आग लागली होती. त्यामुळे या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक घटनस्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यास सुरुवात केली, पण यादरम्यान अचानक एका घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात अग्निशमन दलाचे तीन जवानांसह चार नागरिक जखमी झाले आहेत. या जखमींना त्वरित ग्लोबल रुग्णालय उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट भागात शनिवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास 1 दुकानाला आग लागली होती. दुकानाला आग लागल्यानंतर जवळच असलेली 2 घरे आगीच्या भक्षस्थानी सापडली. घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केलेले होते. आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचे काम तातडीने सुरू केले. यावेळी स्थानिक लोकांनी एकच गर्दी केली होती.

आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक एका सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात 2 कर्मचारी आणि स्थानिक लोकं जखमी झाले. हा स्फोट इतका भीषण होता की, त्याची तीव्रता दूरपर्यंत जाणवली. स्थानिकांची एकच धावपळ उडाली होती. जखमी लोकांना तातडीने ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेत स्पेअर्स पार्टचे दुकान आणि त्याला लागून असल्याच घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here