क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा विचार पुढे नेण्याची गरज • सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन • भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

53
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा विचार पुढे नेण्याची गरज • सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन • भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा विचार पुढे नेण्याची गरज
• सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
• भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा विचार पुढे नेण्याची गरज • सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन • भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर, 16 नोव्हेंबर
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे व्यक्तिमत्त्व वाघानेही हेवा करावा असे होते. आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना अभिमानाने उर भरून आला आहे. पण एवढ्यावर थांबता येणार नाही. भगवान बिरसा मुंडा यांनी स्वराज्याचा संकल्प केला होता, आपल्याला हा संकल्प सुराज्याच्या दिशेने घेऊन जायचा आहे. त्यासाठी त्यांचा विचार पुढे नेणे ही काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या 12 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिरपूरचे गोंड राजे केशवशहा आत्राम, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, प्रमोद कडू, अशोक तुमराम, माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, भाजपा प्रदेश महिला महामंत्री अल्का आत्राम, धनराज कोवे, चंद्रकला सोयाम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘आज समाजा-समाजात द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे देशापुढे जल, वायू, ध्वनी प्रदूषणाचे आव्हान आहेच. मात्र त्यासोबत विचार प्रदूषणाचेही मोठे आव्हान आहे. 21 व्या शतकात तंत्रज्ञानाने आयुष्य बदलले. पण मानसिक स्वास्थ बिघडले हे खरे आव्हान आहे. त्यावर मात करायची असेल तर मी वाईट वागणार नाही, मी प्रामाणिकपणे आयुष्य जगेन, दुसर्‍याची रेष पुसणार नाही, स्वतःची रेष मोठी करेन, असा संकल्प करावा लागेल. हा संकल्प करण्याची प्रेरणा बिरसा मुंडा यांच्या विचारांमधून मिळणार आहे. कर्तृत्व दाखवायचे असेल, अन्यायाविरुद्ध एल्गार करायचा असेल तर वय आडवे येत नाही, याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे क‘ांतीवीर बिरसा मुंडा आहेत, असेही ते म्हणाले. समाजासाठी बलिदान देण्याची भगवान बिरसा मुंडा यांची वृत्ती आदर्श असल्याचे ते म्हणाले.
आपण एकाच ठिकाणी नव्हे तर जिल्ह्यात विविध ठिकाणी आदिवासी वसतिगृहांना मान्यता घेतली. चंद्रपूरचे वसतीगृह बांधून तयार आहे. पोंभूर्णा आणि सावलीलाही आदिवासी मुलामुलींचे वसतीगृह होणार आहे. ब‘ारपुरजवळील 50 एकर जागेत 62 अभ्यासक‘म असलेले एसएनडीटी विद्यापिठाचे विदर्भातील मोठे केंद्र कौशल्य विकासाला प्राधान्य देणार आहे. आदिवासी मुलींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेता यावे याकरिता 300 मुलींचे वसतीगृह करण्याचा आपला प्रयत्न आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले. समाजातील तरुणांना साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. आदिवासी तरुण जेव्हा वैमानिक होऊन आकाशात उंच उडेल, तेव्हा जिल्ह्यासह देशाचाही गौरव वाढणार आहे, अशी भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने स्टेडियम

• मी मंत्री नसतानाही केंद्राकडे पाठपुरावा करून वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने डाक तिकीट काढले. आता त्यांच्या नावाने एक भव्य स्टेडियम चंद्रपुरात होणार आहे. 25 कोटी रुपये आधीच मंजूर झाले आहेत. पण विदर्भातील सर्वांत उत्तम स्टेडियम उभारण्यासाठी अतिरिक्त निधीला मंजुरी मिळवून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. 2036 च्या ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणारे खेळाडू घडविण्याचे काम या स्टेडियमच्या माध्यमातून होईल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.