राष्ट्रिय आदिवासी एकता परिषदे तर्फे बिरसा मुंडा जयंती निम्मित प्रबोधन कार्यक्रम
✒️बबलू भालेराव ✒️तालूका प्रतिनिधी, ऊमरखेड मो.9637107518
उमरखेड (दि. 16 नोव्हेंबर) तालुक्यातील गाडी बोरी येथे आदिवासी वनवासी नसून आदिवासी हिच आदिवासींची मूळ ओळख आहे.
भारतातील अनेक हायकोर्टाचे जजमेंट आहेत. ज्यामध्ये आदिवासींचा कुठलाच धर्म नाही ते प्रकृती पूजक आहेत.
असे असताना काही आदिवासी आणि संविधान विरोधी शक्ती ह्या आदिवासींना वनवासी बनवून त्यांचे संविधनिक हक्क अधिकार नष्ट करण्याचे षडयंत्र करीत आहेत.
असे परखड राष्ट्रिय आदिवासी एकता परिषद चे राष्ट्रीय प्रचारक तथा भारतीय युवा मोर्चा चे राष्ट्रीय महासचिव विद्वान केवटे यांनी केले.
ते गाडी बोरी येथे जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतनिमित्त आयोजित भव्य प्रबोधन कार्यक्रमात बोलत होते..
यावेळी त्यांच्या हस्ते आदिवासींची अस्मिता असणारा पिवळा ध्वज तथा धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या चित्राचे भव्य अनावरण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद चे सूरज मोरे यांनी,”आदिवासी हा वनवासी नसून इथली मनुवादी व्यवस्था धार्मिक वातावरण निर्माण करून आदिवासींच्या इतिहासात घुसखोरी करून आदिवासींचा वापर करण्याचे षडयंत्र करीत आहे” असे मत व्यक्त केले.
राष्ट्रिय किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष पुंजाराम हटकरे, भारतीय विद्यार्थी मोर्चा चे तालुकाध्यक्ष भूषण पठाडे, यांच्यासह प्रमुख उपस्थिती म्हणून गावचे उपसरपंच आदिनाथ वानोळे हे होते.
भव्य प्रबोधन कार्यक्रमातून विचारांची मेजवानी ग्रहण करीत राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेची स्थापना करण्यात आली.
यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जननायक बिरसा मुंडा जयंती उत्सव समितीने परिश्रम घेतले.