कळमना येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात
राजूरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने✍🏽
9921115235
राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे आदिवासीर अस्मितेचे प्रतिक क्रन्तिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले. ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस, कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांच्या विरोधात फार मोठा लढा देऊन आदिवासी समाजाला न्याय मिळवून दिला. आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात ब्रिटिश सरकार च्या विरोधात लढा दिला. त्यांच्या सहकार्याने आदिवासी समाजाने जल, जंगल, जमीन ही संपदा वाचवली व जोपासली म्हणून आज सुध्दा आदिवासी बांधव दऱ्या खोर्यात वास्तव्य करीत असुन आपली संस्कृतीचे जतन करीत आहेत. शिक्षणाची कास धरून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक ठेवा आपण सगळ्या नी जतन व संवर्धन करण्यासाठी सगळ्या बहुजन समाजातील सर्व घटकांना एकत्रित करून काम करण्याची भूमिका घेतली पाहिजे हिच खऱ्या अर्थाने भगवान बिरसा मुंडांना आदरांजली असेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
* या प्रसंगी उपसरपंच कौशल्या कावळे, पोलिस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेळे, सुनिता उमाटे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव ताजणे, गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव दत्ताजी पिंपळशेळे, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते सुरेश गौरकार, महादेव आबिलकर, रमेश आत्राम आदिवासी समाज मंडळाचे अध्यक्ष शंकर गेडाम, रामकिसन आत्राम, पुंडलिक मेश्राम,जैराम गेडाम, विनोद सिडाम, मारोती आत्राम मारोती टेकाम, काशिनाथ गेडाम, प्रदिप आत्राम, सुनील मेश्राम,संदिप आत्राम लताबाई आत्राम जिजाबाई पुंडलिक मेश्राम, मंदा गेडाम, शोभा आत्राम इंदिरा मेश्राम गिता गेडाम, कांताबाई आत्राम यासह स्थानिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.