मौजा मुठरा येथील नाल्यापलीकडील रोहित्र जळल्याने शेतकर्यांच्या डोळ्यात आले अश्रू, सहाय्यक अभियंता श्री ढेकणे व श्री. राऊत आले मदतीला धावून
शुध्द्धोधन निरंजने
राजूरा तालूका प्रतिनिधी
मो: 9921115235
मुठरा :- दि. १८ राजूरा तालुक्यातील मुठरा येथील शेतीला लागणारा पुरवठा करणारा विद्युत रोहित्र जळल्याने, शेतातील पिके नष्ट होतील या भितीने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडले होते. परंतु गावातील सधन शेतकरी श्री भसवय्या नागेतू यांनी लाईमन श्री. सलामे यांना दुरध्वनी वरून संपर्क केला. त्यानंतर श्री शुद्धोधन निरंजने यांनी सुध्द श्री. सलामे लाईन मन यांना फोन करून कळविले त्यांनतर श्री सलामे लाईन मन यानी आज सकाळी ०८. ३० वाजता येऊन सदर रोहित्राची पाहणी करून आपल्या वरिष्ठ अधिका-यांना कळविले. यापूर्वी दि. ११-१०.२०23 ला नाल्या पलीकडील परिसरात ६३ के.व्ही.क्षमतेचा रोहित्र लावण्यात आला होता. परंतु अचानक दि.१७.११.२०२३ ला अंदाजे ०४.३०. ते ०५.०० वाजताच्या दरम्यान रोहित्र अचानक जळल्याने शेतकर्यांवर मोठे संकट ओढवले.
आपली पिके आता करपणार सोयाबीनचे हातात आलेले -पिक मोझॅक ॲलो या रोगामुळे गेले, दुबार पिक कसे घ्यायचे, मिरचीला पाणी कसे दयायचे, जनावरांना पाणी पिण्याची समस्या निर्माण होईल, फवारणी करता येणार नाही पण श्री सलामे लाइन मन यांनी वरिष्ठ अधिकारी मा. श्री ढेकणे व राउत साहेब (उप- अभियंता) म.रा. वि.वि.-कंपनी गडचांदूर यांना श्री. शुध्दोधन निरंजने, श्री भासय्या नागेतू, यांनी संपर्क साधून संपूर्ण हकीकत कथन केली असता या दोन्ही अभियंत्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सायंकाळी ०५- ०० वाजताच्या आत ६३ के.व्हि. क्षमतेचे रोहित्र लावून दिले.
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, पहिलेच शेतकरी वर्ग सततच्या नापिकीमुळे त्रस्त झालेला होता आणि आता ऐन शेतीला पाणी द्यायच्या वेळेला रोहित्र जळल्याने शेतकरी दुःखात सापडला होता. परंतु मा. श्री. ढेकणे व मा. श्री. राऊत या दोन्ही उपअभियंत्याने शर्तीचे प्रयत्न करुन शेतक-यांचे अश्रू पुसल्याने, शेतकरी वर्गाच्या चेह-यावर आनंद ओसरू लागला आणि शेतकर्यांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.