वेध विकासाचा व लढवय्या या दिवाळी अंकाचे सौ.माधवीताई जोशी आणि नरेश जोशी यांच्या हस्ते प्रकाशन

54

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड
📞9011199333📞

मावळ :- वेध विकासाचा व लढवय्या हे साप्ताहिक वर्तमानपत्र रायगड जिल्ह्यातून नेहमी प्रकाशित होणारे वर्तमानपत्र असून त्यामध्ये समाजात भेडसावणाऱ्या समस्या गोरगरिबांवर होणारे अन्याय यांना वाचा फोडण्याचे काम या वर्तमानपत्रातून होत असते .वर्तमान पत्र हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे.सामाजिक तसेच जागतिक स्तरावर होणाऱ्या दैनंदिन घडामोडी वाचकापर्यंत तत्परतेने पोहचवण्याचे काम या वृत्तपत्रांतून नेहमीच होत असते. परंतु वर्षातून एकदा वाचकांना काहीतरी उत्कंठावर्धक , आगळे वेगळे लेख वाचायला मिळावे यासाठी वेध विकासाचा व लढवय्या या दिवाळी अंकाचे प्रकाशन सोहळा मावळ लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निरीक्षक सौ.माधवीताई नरेश जोशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य नरेश जोशी यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी डॉ साईनाथ डोईफोडे,जेष्ठ पत्रकार विजय मांडे ,जयेश जाधव, संदेश साळुंके, दीपक पाटील, रोशन दगडे ,जगदीश दगडे ,आनंद सकपाळ, कांता साबळे, गणेश पाटील ,भूषण प्रधान व आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.