समाजसेवक नामदेवराव गावतुरे यांच्या 85 व्यां वाढदिवसानिमित्त अभिष्ठ चिंतन सोहळा साजरा

समाजसेवक नामदेवराव गावतुरे यांच्या 85 व्यां वाढदिवसानिमित्त अभिष्ठ चिंतन सोहळा साजरा

समाजसेवक नामदेवराव गावतुरे यांच्या 85 व्यां वाढदिवसानिमित्त अभिष्ठ चिंतन सोहळा साजरा

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
चंद्रपूर

मुल : 21 नोव्हेंबर
मूलचे प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक, कांग्रेस विचारसरणीचे सेवादल मुल तालुका प्रमुख नामदेवराव बाबाजी गावतुरे (डॉ. राकेश गावतुरे यांचे वडील तसेच डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे सासरे) यांचा ८५ वा वाढदिवस अनेक आपतेष्ट, कार्यकर्त्यांच्या आणि समाज बांधवांच्या उपस्थितीत अभिष्ठ चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला .
कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आ. प्रतिभा धानोरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्या म्हणाल्या गावतूरे काका यांनी गरिबीतून कुटुंबाची प्रसंगी समाजाची प्रगती साधण्याचा प्रयत्न करण्याचा मौलिक सल्ला आपल्या कार्यकाळात दिला यात शशिकला काकूंचा मोलाचा वाटा असल्याचे आ. प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.
20 नोव्हेंबर 1938 रोजी बाबाजी पाटील गावतुरे व भागाबाई गावतुरे यांच्या पोटी नामदेवरावांचा जन्म झाला त्या काळात शिक्षणाच्या सोयी गावात नसल्यामुळे चौथीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर शिक्षणात खंड पडला परंतु शिक्षणाची आवड आणि संघर्ष करण्याचं साहस असल्यामुळे मुल येथील चरखा संघ वस्तीगृहात काम करून स्वतःची उपजीविका कमवून दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. गांधीजींच्या महान स्वदेशीच्या विचाराने ते प्रेरित होते.
विनोबांच्या सर्वोदय आंदोलनामध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला होता. पेन्शन संघटना मूलच्या अध्यक्षपदी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्थेचे सचिव म्हणून आजही नामदेवराव कार्यरत आहेत. आपल्या सामाजिक कार्यासोबतच खेड्यापाड्यात राहून सुद्धा त्यांनी आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर, प्रशासकीय अधिकारी बनवत उच्च विद्या विभूषित केले.
मंचावर माजी जि. प अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार,मा.जि.प सदस्य प्रा. राम महाडोळे, दीपक पाटील वाढई, प्रल्हाद कावळे सर, उमाजी दादा मंडलवार, प्रा. गुलाब मोरे, प्रा.कऱ्हाडे, डॉ. सचिन भेदे, जिल्हा रुग्णालयाचे डॉ .बंडू रामटेके समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोणबले, साहित्यिक प्रब्रह्मानंद मडावी, नीपचंद शेरकी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अभिष्टचिंतन सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ .राकेश गावतूरे यांनी केले तर नामदेवराव गावतूरे यांची जीवन गौरव गाथा सन्मानपत्र डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी वाचून दाखविले. संचलन एड. मोहुर्ले यांनी केले. सोहळ्याला तीन तालुक्यासह जिल्ह्यातील असंख्य प्रतिष्ठित नागरिक, समाज बांधवांची यावेळी उपस्थिति होति.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here