निलेश लंके यांच्याकडून हजरत कमरअली दुर्वेश दर्गा दर्शन यात्रेचे आयोजन

अक्षय पवार, अहमदनगर 

निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित पारनेर मतदार संघातील मुस्लिम महिलांना मोफत हजरत कमरअली दुर्वेश दर्गा दर्शन यात्रेचे लोकनेते आमदार निलेश लंके याच्याकडून आयोजन करण्यात आले . मतदार संघातील हजारो मुस्लिम माता भगिनी व मुस्लिम बांधव या यात्रेत खुप मोठ्या संख्खेने सहभागी झाले . आलेल्या सर्व मुस्लिम माता भगिनी व बांधवासोबत आमदार निलेश लंके यान्ही हजरत कमरअली दुर्वेश यांचे दर्शन घेतले. व पारनेर मतदार संघातील प्रत्येकाला जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य, समाजात एकता, बंधुता, सौहार्दाची भावना वाढीस लागो ही प्रार्थना केली. यावर्षी प्रमाणे दर वर्षी पारनेर मतदार संघातील मुस्लिम महिलांना व बांधवांना हजरत कमरअली दुर्वेश दर्गा दर्शन यात्रा आयोजन केले जाईल असे आमदार निलेश लंके म्हणाले.

 पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर येथील हजरत पिर कमरअली दुर्वेश यांचा दर्गा हा देशभरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जाताे. मुस्लिम भाविकांसाेबतच हिंदूधर्मीय येथे दर्शनास येतात. रमजानच्या काळात गावातील हिंदू कुटुंबीयांकडून पाच दिवसांपासून २१ दिवसांपर्यंत राेजे धरले जातात. तसेच श्रावण आणि आषाढात दर्ग्याच्या वतीने पालखीचे आयोजनही केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here