डॉ.साईनाथ डोईफोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी पनवेल तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती

.
डॉ.साईनाथ डोईफोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी पनवेल तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती

डॉ.साईनाथ डोईफोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी पनवेल तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞९०१११९९३३३📞

दिवाळी हा सण तास आपल्या सर्वांच्या स्नेह आपुलकी वाढवणारा सण. दिव्याच्या तेजोमय प्रकाशने अंधकारमय विश्वात गुरफटलेल्या बंधनाना मुक्त करून नवीन नात्याची सुरुवात होते त्यात माधवी ताई जोशी युवा प्रतिष्ठान मार्फत नेहमीच विशेष उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाअंतर्गत समाजातील दुर्बल घटकांचा विकास साधणे हा प्रमुख उद्देश असतो. सत्ते पेक्षा समाजकार्य अधिक महत्वाचे हा निःस्वार्थ. आज प्रत्येक गोरगरीब कुटुंबांना जीवनावश्यक सेवा पुरवून, प्रत्येकाच्या मनात जगण्याची नवी उमेद निर्माण करणारे एकमेव प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व.
मावळ लोकसभा निरीक्षक महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सौ माधवी ताई नरेश जोशी आणि कार्यकारिणी सदस्य महारष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा.श्री नरेश जोशी साहेब यांच्या विशेष उपक्रमातून आज रोजी गौरकामात ग्रामपंचायत डोणेवाडी येथे आदिवासी बंधुबघिनी सोबत अनोख्या बंधनात भाऊबीज साजरी करण्यात आली. प्रत्येक महिलेला साडी, पुरुषांना शर्ट पिस व पँट पिस.
मुखी घास देता जन्माची पुण्याई मिळे, चिमुकल्यांना खाऊ वाटप करताना सर्वांच्याच चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा होता. सदर प्रसंगी साईनाथ डोईफोडे,तानाजी चव्हाण, शैलश चव्हाण, सुनील पाटील ,रोशन दगडे,दिलीप वाघ,जगदीश दगडे, सागर घोडगे, स्वप्नील गायकर, यांसोबत आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here