बजरंग दल गोरेगांव लोणेरे विभागाची धडक कार्यवाही…तुळशी विवाहाच्या पावन दिवशी दिले १२ गोवंश जनावरांना जीवनदान… गोरक्षा प्रमुख आदित्य रमेश गोरेगांवकरांनी केली मोहिम फत्ते.

65
बजरंग दल गोरेगांव लोणेरे विभागाची धडक कार्यवाही...तुळशी विवाहाच्या पावन दिवशी दिले १२ गोवंश जनावरांना जीवनदान... गोरक्षा प्रमुख आदित्य रमेश गोरेगांवकरांनी केली मोहिम फत्ते.

बजरंग दल गोरेगांव लोणेरे विभागाची धडक कार्यवाही…तुळशी विवाहाच्या पावन दिवशी दिले १२ गोवंश जनावरांना जीवनदान…

गोरक्षा प्रमुख आदित्य रमेश गोरेगांवकरांनी केली मोहिम फत्ते.

बजरंग दल गोरेगांव लोणेरे विभागाची धडक कार्यवाही...तुळशी विवाहाच्या पावन दिवशी दिले १२ गोवंश जनावरांना जीवनदान... गोरक्षा प्रमुख आदित्य रमेश गोरेगांवकरांनी केली मोहिम फत्ते.

नितेश पुरारकर
गोरेगाव (रायगड) प्रतिनिधी
७०२११५८४६०

गोरेगाव :छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी मध्ये गोवंश हत्येचे प्रकार वारंवार घडत आहेत हि मोठी शोकांतिकाच आहे. या आधी काही महिन्यांपूर्वी राजेवाडी-महाड मध्ये सुद्धा अश्याच प्रकारची घटना घडली होती. सरकारद्वारे कठोरातील कठोर निर्बंध जाहीर केले असताना सुद्धा आपल्या विभागात होणार्‍या गोवंश प्राण्यांची कत्तलीमुळे बजरंग दल ( गोरेगांव ) ही संघटना खूप आक्रोशात असल्याचे दिसून येते.

दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री सुमारे ९:३० वाजता आपल्या घरातील तुळशी विवाह समारंभामध्ये व्यस्त असताना एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याने गोरक्षा प्रमुख आदित्य रमेश गोरेगांवकरांशी संपर्क साधून गोवंश जनावरे भरून, कत्तलीच्या उद्देशाने मुंबई दिशेने चाललेले वाहन एम. एच. ०३/ डि. व्ही./ ५५१३ याची माहिती दिली. सदर माहिती मिळताच कोणताही विलंब न करता त्यांनी लोणेरे नाक्यापासून ते अगदी नागोठाणे पर्यंत आपल्या गोरक्षा समितीचे कार्यकर्त्यांची फळी उभी केली. परंतु वाहन चालकला या गोष्टीचा सुगावा लागला आणि त्याने त्याचे वाहन लोणेरे नाक्यावरून गोरेगांवच्या दिशेने वळवले. सदर बाब लक्ष्यात येता गोरक्षा प्रमुख आदित्य रमेश गोरेगांवकर यांनी आपल्या जिवाची कसलीही परवा न करता त्या वाहनाचे, आपल्या दुचाकीच्या सहाय्याने पाठलाग केले व बजरंग दल अध्यक्ष विशाल रामचंद्र भुसकूटे यांना सूचितही केले.

बजरंग दल अध्यक्ष विशाल रामचंद्र भुसकूटे आणि बजरंग दल कार्यकर्ते आनंद राजभर यांना संबंधित माहिती मिळताच त्यांनी वाहन पकडण्यासाठी चिंचवली फाट्यावर सापळा रचला. परंतु ते वाहन त्यांच्या हातातून निसटले व पुढे जाऊ लागले. इतक्यात मागून पाठलाग करित असलेले गोरक्षा प्रमुख आदित्य रमेश गोरेगांवकर यांनी त्या वाहनाला ओवरटेक करून थांबविण्याचे प्रयत्न केले असता वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन दुचाकीवर स्वार असलेले गोरक्षा प्रमुख आदित्य रमेश गोरेगांवकर यांच्या अंगावर घातले व सुदैवाने त्यांनी वेळेत आपली दुचाकी बाजूला करून आपले बचाव केले आणि पुढे ते वाहन दुप्पट गतीने पळू लागले.

परंतु त्याचे पाठलाग करायचे कार्यकर्त्यांनी सोडले नाही व पुढे पत्रकार प्रसाद रमेश गोरेगांवकर सुद्धा या घोडदौड मध्ये सामिल झाले व पुढे पत्रकार प्रसाद रमेश गोरेगांवकर यांनी आपल्या ताब्यातील ४ चाकी वाहन त्याच वेगाने पळवत गोवंश जनावरे घेऊन जाणार्‍या वाहनाला खामगाव घाटा मध्ये गाठले. वाहनापासून काही अंतरावर दुचाकीच्या सहाय्याने चालत असलेले बजरंग दल अध्यक्ष विशाल रामचंद्र भुसकूटे आणि आनंद राजभर वाहनाबद्दल तंतोतंत माहिती सतत पुरवत होते.

म्हसला पोलीस दलाला संबंधित वाहनाची माहिती दिली असता, कोणताही विलंब न करता त्यांनी साई चेक पोस्टवर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त लावले आणि वाहन आपल्या ताब्यात घेतले. अखेर या संघर्षाचे अंत झाले व पोलीस दलाने दोन मुख्यआरोपी, चालक आणि क्लीनर यांना अटक करून आपल्या सर्वोत्तम शौर्याचे व कर्तव्यपूर्ण कार्याचे उदाहरण पुन्हा एकदा लोकांस दाखवून दिले.

आरोपी मोबील अब्दुल हसन शेख (३०) रा. कुर्ला इतेफार चाळ नं. २, रामू गणू मार्ग, कुर्ला ईस्ट मुंबई ७०, आरोपी मिरज अहमद कुरेशी रा. हरी मस्जिद दादमियाॅ, चाळ नं. ५ मुंबई ईस्ट १३३/२०२३ भा. द. वि. कलम ३७९, ३५३ सह महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (अ),९, प्राण्यांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (घ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ अन्वये आपल्या ताब्यातील एम. एच. ०३/ डि. व्ही./ ५५१३ वाहनामध्ये गोवंश जातीचे एकूण १२ जनावरे त्यांना खाण्यास चारा पाणी न ठेवता कत्तलीसाठी, दाटीवाटीने कोंबून वाहतुक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले असून पुढिल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सोनावणे, उपविभागीय पोलीस अधिकारी पी. आर. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करित आहेत.

छायाचित्रण – बजरंग दल अध्यक्ष विशाल रामचंद्र भुसकूटे. छायाचित्रात उपस्थित मान्यवर – सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सोनावणे, गोरक्षा प्रमुख आदित्य रमेश गोरेगांवकर, पत्रकार प्रसाद रमेश गोरेगांवकर, बजरंग दल कार्यकर्ते ओंकार गोरेगांवकर, सामाजिक कार्यकर्ते अनुज गोरेगांवकर.