वडवली येथे आमदार भरतशेठ गोगावले, सुषमाताई गोगावले सह विजयी सरपंच उपसरपंच व सदस्यांची थाटामाटात भव्य मिरवणूक

53
वडवली येथे आमदार भरतशेठ गोगावले, सुषमाताई गोगावले सह विजयी सरपंच उपसरपंच व सदस्यांची थाटामाटात भव्य मिरवणूक

वडवली येथे आमदार भरतशेठ गोगावले, सुषमाताई गोगावले सह विजयी सरपंच उपसरपंच व सदस्यांची थाटामाटात भव्य मिरवणूक

वडवली येथे आमदार भरतशेठ गोगावले, सुषमाताई गोगावले सह विजयी सरपंच उपसरपंच व सदस्यांची थाटामाटात भव्य मिरवणूक

 

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-माणगाव तालुक्यात वडवली ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार मजहर डावरे यांनी ६०७ मताधिक्याने विरोधी उमेदवाराचा दाढून पराभव केला तसेच सदस्य पदाच्या सर्व ९ सदस्यांनी विजयी मिळवून वडवली ग्रामपंचायत निवडणुकात शिवसेना शिंदे गटाने विरोधकांना क्लीन बोल्ड केले आहे व मजहर डावरे यांच्या विजयी मुळे वडवली ग्रामपंचायत वर शिवसेनेने विजयाची हॅट्ट्रिक मारली आहे.

२५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी वडवली येथे ग्रामपंचायत वडवली व मांजरोने गणातील शिवसेना शिंदे गटाच्या सर्व विजयी सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या जाहीर सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सत्कार समारंभ कार्यकर्माची सुरुवात वडवली येथील मुख्य मार्गावरून आमदार गोगावले यांच्या भव्य मिरवणूक द्वारे करण्यात आली, विशाल रथावर विराजमान आमदार भरतशेठ गोगावले सह सुषमाताई गोगावले व वडवली ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांची वडवली मुख्य मार्ग ते वडवली मोहल्ल्यात खालू बाजा च्या तालावर वाजत गाजत,लेजीम खेळत उत्साहित शिवसेना कार्यकर्ते युवामंडळी महिलावर्ग व ग्रामस्थांकडून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक दरम्यान अचानक आमदार गोगावले यांनी लेजीम वर ठेका धरला त्यामुळे मोठ्या प्रमाणात उपस्थित आनंदित शिवसैनिकांचा उत्साह दुप्पट झालेला पाहाव्यास मिळाला.

आमदार गोगावले यांनी अचानक लेजीम वर ठेका धरल्याने कार्यकर्त्यांचे उत्साह झाले दुप्पट

वडवली येथे सरपंच व सर्व ९ सदस्यांनी विजय मिळवून विरोधकांना केले क्लीन बोल्ड, शिवसेना पक्षाची हॅट्रिक

आमदार गोगावले यांच्या शुभहस्ते झाला ग्रामपंचायत वडवली व मांजरोने गणातील विजेता सरपंच उपसरपंच व सदस्यांचा जाहीर सत्कार

भव्य मिरवणूकनंतर जाहीर सत्कार समारंभ कार्यक्रमात आमदार गोगावले, सुषमाताई गोगावले व उपस्थित शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत निवडणूक २०२३ मध्ये ग्रामपंचायत वडवली व मांजरोने गणातील सर्व विजयी शिवसेना पक्षाच्या सरपंच उपसरपंच व सदस्यांना शाल पुष्पगुच्छ व श्रीफल देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी जाहीर सत्कार समारंभ कार्यक्रमाला आमदार भरतशेठ गोगावले, सुषमाताई गोगावले सह शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा संघटक, जिल्हा महिला संघटक जिल्हाप्रमुख, जिल्हा युवासेना प्रमुख, तालुका महिला संघटक, तालुका प्रमुख, आपलसंख्यांक तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, युवासेना विभाग प्रमुख, माजी सभापती,मांजरोने गणातील अनेक शिवसेना पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते, युवामंडळी व बहुसंख्य महिला व ग्रामस्थ हजर होते.