चांदोरे ग्रामपंचायत येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा.
नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048
माणगाव : दिनांक 26/11/24 रोजी माणगाव तालुक्यातील चांदोरे ग्रामपंचायत येथे संविधान दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 10.30 वा. कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सरपंच यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्व ग्रामस्थांनी पूजन केले, संविधान दिना निमित्त आलेल्या सर्व बंधु आणि भगिनी यांनी मनोभावे पूजन केले. आणि बुद्ध वंदना घेण्यात आली नंतर संविधानाची प्रस्तावना वाचून शपथ, उपस्थित नागरिकांनी घेतली.
संविधान दिना निमित्त आलेल्या सर्व नागरिकांचे सरपंच यांनी स्वागत केले तसेच
सरपंच साक्षी शिंदे यांनी संविधाना विषयी आपले अनमोल असे विचार मांडले, चांदोरे बौद्धवाडी सचिव बाळाराम तांबे यांनी सुध्दा संविधान किती महत्त्वाचे आहे हे सभेस असणाऱ्या सर्व ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिले, माजी सरपंच सखाराम मोहिते, दिपक तांबे आणि पंचायत समिती माजी सभापती सुजित शिंदे यांनी सुध्दा संविधानाचे महत्त्व सर्व ग्रामस्थांना समजावून सांगितले. या क्षणी मा.सरपंच साक्षी सुजित शिंदे, उपसरपंच नथुराम चाचले, माजी सरपंच सखाराम मोहिते, विष्णु भोसले,पोलीस पाटील संतोष आंबेकर, मानव अधिकार माणगाव तालुका अध्यक्ष बाळाराम तांबे, पत्रकार नंदकुमार चांदोरकर, पंचक्रोशीतील सर्व अंगणवाडी सेविका, आशाबाई, ग्रामपंचायत कर्मचारी,सर्व नागरिक व महिला भगिनी या शुभ दिनी उपस्थित होत्या. उत्साहाने आणि शांततेत हा कार्यक्रम पार पडला.