जगभरातल्या युद्धाची किंमत काय? ९४०,००० जिवंत लोक…
मनोज कांबळे: २००१ पासून जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक युद्ध सुरु झाली. संपली, नवीन सुरु झाली. या युद्धांनी देशांच्या सीमा बदलल्या, लोकांचे धर्म बदलले, लोकांचे देश बदलले. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या खड्या पहाऱ्यात युद्धभूमीपासून कोसो दूर भव्य दिव्य कार्यालयात बसून राजकारणी, लॉबीमाफिया यांनी या युद्धांचे आदेश दिले. पण या युद्धाची किमंत किती आहे माहित आहे ? …९४०,००० जिवंत लोक. कधी जिवंत असलेल्या लोकांनी आपले प्राण गमावून या युद्धांची किंमत चुकवली.
अमेरिका इराक – इराण युद्ध, अमेरिका – अफगाणिस्तान युद्ध, आफ्रिकेतील अनेक देशातील सिविल वॉर आधुनिक जगामध्ये युद्धांना काही कमी नाही. तंत्रज्ञान विकसित झाले, त्याचबरोबर अधिक विध्वसंक शस्त्रास्त्रे विकसित झाली. एका मिनिटाला शेकडो माणसांचा बाली देणाऱ्या बंदुका निघाल्या. आकाश, जमीन आणि पाण्यावरून दुश्मनांना एका क्षणात मिटवता येतील अशी यंत्र बनली. या यात्रांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या उदयास आल्या आणि युद्ध एक व्यवसाय बनला. पण हा एक असा व्यवसाय बनला, ज्यामध्ये ग्राहक स्वतःच्याच खिशातले पैसे खर्च करतो, प्रॉडक्ट विकत घेतो आणि त्या प्रॉडक्टद्वारे स्वतःचे मरण ओढवूंन घेतो.
https://mediavartanews.com/2023/11/29/history-of-conflicts-between-palestine-israel/
या युद्धांच्या प्रोडक्टचे मार्केटिंग करण्यासाठी खास लोक असतात. धर्माच्या नावाखाली, पंथाच्या नावाखाली, वंशाच्या नावाखाली शोधत शोधत ते नागरिकांच्या घरात शिरतात आणि मग त्यांच्या बुद्धीत. मग माणसांच्या बुद्धीवर त्यांचा एवढा मोठा पगडा बसतो कि, माणसं युद्ध विकत घेण्यासाठी स्वतःचे घरदाराची राख रांगोळी करण्यास तयार होता. मग घरातून, गल्ली बोळातून, चौकातून छोट्या मोठ्या युद्धांना सुरुवात होते. धर्माच्या, पंथाच्या, वंशाच्या फुकट फुशारकीत हाडामासांचे शेजारी दुश्मन बनतात. असे युद्धांच्या प्रोडक्टचे मार्केटिंग करणारे भव्य दिव्य युद्धासाठी पाया तयार करतात. याच भक्कम पायावर देशा-देशांमधील युद्धाचा डौलारा उभा राहतो.
आज जगात युक्रेन – रशियाचे युद्ध भयानक युद्ध सुरु आहे. इराक – इराण देश तर गेल्या दोन दशकांपासून जळत आहेतच. अफगाणिस्तानमध्ये लोकशाही प्रस्थपित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करून अमेरिका गेल्यावर्षी अफगाणिस्तानमधून निघून गेली. आता अफगाणिस्तान स्वतःचा स्वतःला उध्वस्त करत आहेत. आफ्रिका देशातील खनिजसंपत्तीवर सगळ्या विकसित देशांचा डोळा आहेच, त्यामुळे त्या देशांमध्ये अराजकता कशी राहील यावर काही स्वार्थी देशांचे खास लक्ष्य आहे. यात भर भारत – पाकिस्तान मधील सीमावाद आहेच.
काही दिवसांपूर्वी इस्राईल आणि पॅलेस्टाईन वाद पुन्हा उफाळून आला. पॅलेस्टाईनमधील हमास गटाने इस्राईल देशात घुसून हल्ला केला. त्याचे प्रतित्युतर देताना इस्राईलने तितक्याच ताकदीने प्रतिकार केला. हा वाद अगदी प्राचीन काळापासून चिघळत आलेला आहेत. सध्या त्याने इतका उग्र रूप धारण केलं आहे कि दोघांपैकी एक पूर्णतः नष्ट होऊनच आता वाद थांबेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसात जवळपास १८०० मृतदेह हाती सापडले आहेत. हजारो लोक बेघर झाली आहेत. हा विनाश कसा थांबेल ? खरेतर याचे उत्तर आजही आपल्याकडे आहे. सर्व जगणे ते मान्य हि केले आहे. हे उत्तर आहे अवकाशात.
जगातील बहुतेक देशांनी अवकाश संशोधनात कमालीची प्रगती केली आहे. हजारो, लाखो कोटी रुपये खर्च करून अवकाशयाने, उपग्रहाच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत आहेत. या देशांनी अवकाशात एक करार केला आहे. अवकाशात असताना कोणताही देश दुसऱ्या देशाच्या यंत्रांवर, माणसांवर हल्ला करणार नाही, त्यांना इजा होईल असे कोणतेही कृत्य करणार नाही. आपले भेदभाव विसरून अवकाशात जर असा करार करत असतील तर मग जमिनीवर असा करार का होऊ शकत नाही? विचार करून बघा. त्यानंतर तरी आपण कदाचित युद्ध विकत घेणं थांबवू.