Home latest News म्हसळा तालुक्यात शिक्षकांच्या अभावामुळे शाळा पडल्या ओस ११केंद्र प्रमुख व पन्नास टक्के...

म्हसळा तालुक्यात शिक्षकांच्या अभावामुळे शाळा पडल्या ओस ११केंद्र प्रमुख व पन्नास टक्के शिक्षकाविना शाळा.

135

म्हसळा तालुक्यात शिक्षकांच्या अभावामुळे शाळा पडल्या ओस ११केंद्र प्रमुख व पन्नास टक्के शिक्षकाविना शाळा.

म्हसळा तालुक्यात शिक्षकांच्या अभावामुळे शाळा पडल्या ओस ११केंद्र प्रमुख व पन्नास टक्के शिक्षकाविना शाळा.

नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048

माणगाव : माजी सभापती रवींद्र लाड यांनी रा.जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या समोर मांडल्या व्यथा
शिक्षणाबाबत तालुक्याला मिळत आहे दुजा भाव…?
विद्यार्थी म्हणून आमचा गुन्हा आहे का.. ?रा.जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांना प्रश्न..
म्हसळा तालुक्यातील रा.जि.प.मराठी शाळा यांची दयनीय अवस्था झाली आहे.शिक्षकांच्या मनाविरुद्ध जिल्हा बदली मुळे अनेक शिक्षक हे न्यायालयात गेले त्या मुळे गेली वर्षभर तालुक्यातील शिक्षणाचा पाया घसरला.अनेक मराठी शाळा शिक्षक नसल्याने ओस पडु लागल्या आहेत, अनेक ठिकाणी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात पट असल्याकारणाने तिथे दोन किंवा तीन शिक्षक दिले जातात त्यामुळे शिक्षकांची दमछाक होते.शिक्षक नसल्याने शाळांची गुणवत्ता घसरत दयनीय अवस्था झाली आहे,विद्यार्थी म्हणून शिक्षण घेणे आमचा गुन्हा आहे का असे विद्यार्थी यांच्यात सुर उमटु लागले आहेत.एक शिक्षक म्हणून त्याने शिक्षक पेशा बघीतले पाहिजे असे न होता हेच शिक्षक व्यवसाय म्हणून बघत आहेत तालुक्यातील शाळांची परिस्थिती पाहता अकरा केंद्र प्रमुख व पन्नास टक्के शिक्षकाविना शाळा आहे रा.जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी भारत बस्तेवाड यांच्या समोर माजी सभापती रवींद्र लाड यांनी व्यथा मांडली.तसेच स्थानिक सेवानिवृत्त होणार्या शिक्षक भरती प्रक्रिया अद्याप अपुर्ण आहे तो प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी यांनी पाठवलेला आहे त्याला त्वरित मंजुरी मिळावी, तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना तात्पुरता स्वरूपात शिक्षक म्हणून सामावून घेतले जावे,जलजिवन योजनेचे तालुक्यात तीनतेरा वाजले आहेत, अनेक ठिकाणी निष्कृष्ट दर्जाचे काम झाले आहे त्याची पाहणी करणे, तालुक्यातील आरोग्य बाबतीत म्हणाल तर ग्रामीण भागात बिकट अवस्था आहे, खरसई, जांभूळ, नेवरुळ,कोळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करुन मिळावे असे अनेक विषयांवर चर्चा करुन मुख्यकार्यकारी अधिकारी बस्तेवाड यांनी लाड यांना आश्वासन दिले की लवकरात लवकर तालुक्यातील शिक्षणाचा पाया सुधारला जाईल व सेवानिवृत्त शिक्षक भरती लवकरच पूर्ण करण्यात येईल तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र देखील सुरू करण्यात येईल , तसेच तालुका आरोग्य अधिकारी हे निष्काळजी पणे आरोग्य कारोबार चालवित असल्याचे डिएच ओ यांच्या निदर्शनास आणून दिले.या सर्व चर्चांमध्ये गटविकास अधिकारी यांची प्रामुख्याने नाराजी दिसण्यात आली, सेवा निवृत्त शिक्षक भरती प्रक्रिया अद्याप अपुर्ण का आहे, न्यायालयात गेलेले शिक्षक यांनी अनेक विद्यार्थी यांचे भविष्य अंधारात ठेवले आहे, अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहीलेत या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरले आहे, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शिक्षक भरती मध्ये का सामावुन घेत नाही, जिल्ह्यातील शाळा उत्तम प्रकारे आहेत मग आमच्या तालुक्याला दुजा भाव का…? शिक्षणखात्याचा सपशेल नाकर्तेपणा आहे.गट.वि.अ. जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत असा माझा आरोप आहे असे माजी सभापती रवींद्र लाड यांनी आमच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.