अखेर सेवानिवृत्त शिक्षक नियुक्ती पत्र जाहीर.. माजी सभापती रवींद्र लाड यांनी घेतलेल्या भेटीला यश..

91
अखेर सेवानिवृत्त शिक्षक नियुक्ती पत्र जाहीर.. माजी सभापती रवींद्र लाड यांनी घेतलेल्या भेटीला यश..

अखेर सेवानिवृत्त शिक्षक नियुक्ती पत्र जाहीर.. माजी सभापती रवींद्र लाड यांनी घेतलेल्या भेटीला यश..

अखेर सेवानिवृत्त शिक्षक नियुक्ती पत्र जाहीर.. माजी सभापती रवींद्र लाड यांनी घेतलेल्या भेटीला यश..

नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048

माणगाव: म्हसळा तालुक्यात शिक्षकांच्या अभावामुळे शाळा पडल्या ओस या मथळ्याखाली दैनिक मीडीया वार्ता मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची व माजी सभापती रवींद्र लाड यांनी घेतलेल्या रा.जि.प मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.भरत बस्तेवाड यांच्या भेटीला यश आले आहे. रविंद्र लाड यांची प्रमुख मागणी होती की रा.जि.प.मराठी शाळांना शिक्षक मिळावे व विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये.यासाठी ३० नोव्हेंबर रोजी म्हसळा पंचायत समिती येथे रा.जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.भरत बस्तेवाड यांची भेट घेऊन कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणारी सेवानिवृत्त शिक्षक नियुक्ती लवकर करण्यात यावी, या भेटीला सकारात्मक वळण लागुन रायगड जिल्हा परिषद शालेय विभागाकडून जा.क्र. ६४३७ दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा परिषद शाळा मध्ये सेवा निवृत्त शिक्षकांना तात्पुरता स्वरूपात कंत्राटी तत्वार नियुक्ती पत्र या आशयाचे पत्रक जाहीर करण्यात आले.या निर्णयामुळे शिक्षकांवर अतिरिक्त भार देण्यात आला होता तो कुठेतरी कमी होणार आहे,ही बातमी विद्यार्थी व शिक्षक यांच्या साठी दिलासा देणारी आहे.त्या मुळे म्हसळा तालुक्यातील शिक्षकांनी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ भरत बस्तेवाड व माजी सभापती रवींद्र लाड यांचे आभार मानले.मी खरच समाधान व्यक्त करतो की मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ भरत बस्तेवाड यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले व सकारात्मक निर्णय घेतला आहे या साठी मी डाॅ भरत बस्तेवाड यांचे आभार व्यक्त करतो.व पत्रकार बांधवानी बातमी लावुन धरली त्यांचे मी आभारमानतो.तालुक्यातील शाळा टिकाव्यात व विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व शिक्षक यांच्या वर टाकलेला अतिरिक्त भार देखील थोड्या प्रमाणात कमी होऊन जास्तीत जास्त वेळ शिक्षणाकडे देऊ शकतील हाच या मागचा उद्देश होता असे माजी सभापती रवींद्र लाड यांनी सांगितले व सकारात्मक निर्णयामुळे समाधान व्यक्त केले.