वनी येथे राष्ट्रवादी पक्षाला मोठा दणका, महिन्या भरात दुसऱ्यांदा असंख्य राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते वनी मोहल्ला येथे अंतर्गत रस्ता व हायस्कूल वॉल कंपाउंड चे धुमधडाक्यात भूमिपूजन

49

वनी येथे राष्ट्रवादी पक्षाला मोठा दणका, महिन्या भरात दुसऱ्यांदा असंख्य राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते वनी मोहल्ला येथे अंतर्गत रस्ता व हायस्कूल वॉल कंपाउंड चे धुमधडाक्यात भूमिपूजन

वनी येथे राष्ट्रवादी पक्षाला मोठा दणका, महिन्या भरात दुसऱ्यांदा असंख्य राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते वनी मोहल्ला येथे अंतर्गत रस्ता व हायस्कूल वॉल कंपाउंड चे धुमधडाक्यात भूमिपूजन

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-ग्रामपंचायत वर्चस्व थोडक्यासाठी निसटले मात्र गावाच्या विकासाची जिद्द बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांकडून सुचवलेली सर्व विकास कामे शिवसेना पार पाडणार : आ. भरतशेठ गोगावले माणगाव तालुक्यात वनी मलईकोंड ग्रामपंचायत हद्दीतील वनी मोहल्ला येथे अंतर्गत रस्ता व उर्दू हायस्कूल वनी येथील वॉल कंपाउंड चा भूमिपूजन आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते पारपडला.सोमवारी संध्याकाळी आमदार गोगावले यांचा मुख्य मार्गावर आगम होताच फटाके वाजवत शिवसेना जिंदाबाद, भरतशेठ आगे बढो हम तुम्हारे साथ है व अनेक घोषणा देत आमदार गोगावले यांचा स्वागत करण्यात आला. राज्यमार्ग ते माजी सरपंच मुअजम बरहानपुरे यांच्या निवास स्थान नजीक रस्ता भूमिपूजन ठिकाणी आमदार भरतशेठ गोगावले यांची खालू बाजावर वाजत गाजत लेजीम खेळत ग्रामस्थांकडून जोरदार मिरवणूक काढण्यात आली व आमदार गोगावले यांच्या वतीने माजी सरपंच मुअजम बरहानपुरे प्रतिष्ठिट ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीफल वाढवून भूमिपूजन करण्यात आला . वनी मुस्लिम समाज उपाधक्ष शाहिद सरखोत व अन्य प्रतिष्ठित ग्रामस्थांच्या हस्ते आमदार गोगावले व उपस्थित शिवसेना पदाधिकारी ग्रामस्थ व परिसरातील अनेक उपस्थित शिवसैनिक व नागरिकांचे पुष्प गुच्छ, शाल व श्रीफल देऊन स्वागत करण्यात आले.

भूमिपूजन कार्यक्रमात आमदार गोगावले यांनी आपल्या भाषणात शिवसेना कार्यकर्ते माजी सरपंच मुअजम बरहानपुरे, सामाजिक कार्यकर्ते सरफराज उमलकर व शकूर सरखोत यांच्या सह ग्रामपंचायत च्या नवनिर्वाचित चार सदस्य व ग्रामस्थांद्वारे ८ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत ग्रामपंचायत वर्चस्व गमवून देखील गावाच्या विकासासाठी झटत असल्याच्या जिद्दीचे कौतुक करण्यात आले तसेच वनी मोहल्ला येथील सुचवलेल्या रस्ता उर्दू हायस्कूल येथे वॉल कंपाउंड व पाणी पुरवठा योजना व्यतिरिक्त इतर विकास कामे देखील पूर्ण करण्यात येतील अशी खंबीर वचन बद्धी आमदार गोगावले यांच्याकडून देण्यात आली. त्यानंतर आमदार गोगावले यांच्या हस्ते वनी मोहल्ल्यातील असंख्य युवा मंडळी महिला वर्ग व ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी आमदार गोगावले, दक्षिण जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, युवा जिल्हाप्रमुख विपुल उभारे, विभाग प्रमुख शरीफ हरगे, अल्पसंख्यांक तालुका प्रमुख सज्जाद गोडमे, माजी सभापती सुजित शिंदे, प्रकाश गोरीवले तसेच अनेक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते वनी येथील महिला वर्ग, युवा मंडळी प्रतिष्ठित ग्रामस्थ व परिसरातील नागरिक हजर होते.