महापरिनिर्वाण दिनानिमित्त घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

55
महापरिनिर्वाण दिनानिमित्त घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त घटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
८९८३२४८०४८

दिनांक ०६/१२/२३ रोजी चांदोरे ग्रामपंचायत येथे महापरिनिर्वाण दिना निमित्त घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि पुष्पहार अर्पण करून पंचशीला घेण्यात आली. तसेच बहुजनांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नंतर उपस्थित काही नागरिकांनी महापरिनिर्वाण दिना निमित्त बोधिसत्व डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले.
६ डिसेंबर १९५६ भारतातील दलितांसाठी या दिवसाची सकाळ सुर्योदयाने नव्हे, तर सूर्यास्ताने उजाडली कारण या दिवशी शोषित-वंचितांचे आधार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले.
जगण्यासाठी आणि शिक्षणासाठीच्या वयक्तिक संघर्षापासून दलितांच्या उत्थाणापर्यंत आणि स्वातंत्र्य भारताची राज्य घटना साकरण्यापर्यंत बाबा साहेब यांचा प्रवास हा खडतर होता.
या संपूर्ण प्रवसा दरम्यान डॉ. बाबा साहेबांना विविध आजारांनी ग्रासल होत. मधुमेह, रक्तदाब, न्युरायटीज, सांधे दुखी अशा असाद्य आजारांनी ते त्रस्त होते,मधुमेहाने त्यांचे शरीर जर्जर झाले होते,संधिवाताचा त्रासामुळे त्यांना अनेक रात्री बिछान्यात तळमळत पडून रहावे लागत असे. डॉ.बाबा साहेबांनी कोण एका धर्माचा नाही तर संपूर्ण भारताचा विचार केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त ग्रामपंचायत चांदोरे सरपंच ताई साक्षी शिंदे, पंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी खैरे सर, माजी सरपंच विष्णु भोसले, पं.स.मा.सभापती सुजित शिंदे,ग्रामपंचायतीचे कर्मचारी,पंचक्रोशीतील सर्व अंगणवाडी सेविका, आशाबाई, स्वदेसचे प्रतिनिधी सुबोध काणेकर, स्वदेस इंजिनियर जगदीश्वर नटे, साई पशुवैद्य डॉ.विशाल घुगे त्यांच्या समवेत डॉ.शहा सेवा निवृत्त वैद्यकीय अधिकारी, तसेच संपूर्ण चांदोरे पंचक्रोशीतील तमाम नागरिक, महिला भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते