शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विवेक बोढे आले धावून
• एसीसी सिमेंटनगरची माऊंट कार्मेल शाळा प्रदूषणाच्या विळख्यात
• पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे शाळेजवळ बनविलेला अवैध कोल डेपो हटवण्याची मागणी
🖋️ साहिल सैय्यद
घुग्गुस तालुका प्रतिनिधी
📱 9307948197
घुग्गुस : 7 डिसेंबर
घुग्घुस येथून जवळच असलेल्या सिमेंटनगरच्या एसीसी कंपनी लगत असलेल्या माऊंट कार्मेल शाळेच्या जवळ एसीसी कंपनीने बनविलेला अवैध अँश व कोल डेपो तत्काळ हटविण्यात यावा अशी मागणी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनाची दखल घेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना अवैध कोल डेपो संदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
घुग्घुस परिसरातील एसीसी कंपनी व्यवस्थापनाने वेळोवेळी चुकीचे निर्णय घेतले आहे एसीसी कंपनीने शाळेला लागून अवैध कोल डेपो बनविला यातून होणाऱ्या प्रदूषणामुळे माऊंट कार्मेल शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांना श्वासाचा त्रास होत आहे. मोठया प्रमाणावर पांढरी धूळ शाळेमध्ये येऊन पुर्ण शाळेचे रूपांतर कोल डेपोत झाले आहे.
उसगावला जाणारा पारंपारिक रस्ता एसीसी कंपनीने बंद केला त्यामुळे उसगाव वासियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. माऊंट कार्मेल शाळेला लागून मुख्य रस्त्यावर नवीन अँश कोल डेपो उघडण्यात आला. या डेपो साठी चक्क उसगाव गावाकडे मुख्य रस्ताच बदलविण्यात आला. शाळेत जाणाऱ्या रस्त्यावर अँशचे ढीगरे व धूळ साचलेले आहे. शाळेत ये जा करण्याऱ्या स्कुलबस, ऑटो व जडवाहने एका अरुंद रस्त्याने जावे लागते. पैसे कमविण्यासाठी एसीसी कंपनी विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे. कोणत्याही क्षणी अपघात होऊन विद्यार्थ्यांचा जीव जाऊ शकतो. त्याअनुषंगाने भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी शिष्टमंडळासह एसीसी कंपनी व्यवस्थापनाची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, संजय तिवारी, संतोष नुने, हनीफ मोहम्मद, किरण बांदूरकर, राजेश मोरपाका, स्वप्नील झाडे व कार्यकर्ते उपस्थित होते.